-
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण कुटुंबाबरोबर किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायला जायचे प्लॅन करतात. यात स्वतःची हक्काची गाडी असेल तर या सहलीला आणखीन मज्जा येते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, हा काळ थंडीचा असल्याने रस्त्यावरून जाताना धुके असण्याची शक्यता जास्त असते. गाडी चालवताना समोरचे काही दिसेनासे होते. त्यामुळे गाडी चालकांनी काही गोष्टींची आवर्जून काळजी घेतली पाहिजे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर दाट धुक्यात वाहन चालवताना लक्षात ठेवण्याच्या पाच सुरक्षा टिप्स पाहू. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. वाहने हळू चालवा : तुम्ही प्रवास करताना रस्त्यावर दाट धुकं असेल तर वाहन वेगात चालवू नका. वेगाने वाहन चालवणे तुम्हाला आणि इतर प्रवाशांसाठी धोका निर्माण करू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. ओव्हरटेक टाळा : धुके असलेल्या रस्त्यावर ओव्हरटेक करणे टाळा कारण त्यामुळे वाहनांची एकमेकांबरोबर टक्कर होऊ शकते. अशावेळी गाडी संयमाने चालवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. हेडलाइट चालू ठेवा : धुक्यात गाडी चालवताना फॉग लाईट्सचा वापर करा. हे लाईट्स हेडलाईटच्या खालच्या बाजूला लहान आकारात असतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. इंडिकेटर (सूचक) वापरा : दाट धुक्यात गाडी चालवताना इंडिकेटर वापरणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे तुमच्या मागून येणार्या किंवा पुढील वाहनांना तुम्ही कोणत्या दिशेने जाणार आहात याचा अंदाज येईल.यामुळे कोणताही अपघात होणार नाही. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. तुमची कार,दुचाकी पार्क करा आणि वाट बघा : जास्त धुकं असेल तर रस्त्याच्या कडेला तुमची गाडी पार्क करा आणि थोडा वेळ वाट पाहा. (फोटो सौजन्य: @Freepik)

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल