-
दूधामध्ये सर्व पोषक तत्वे आढळतात. म्हणूनच दुधाला सुपरफूड देखील म्हंटले जाते. पण, तुम्हाला माहिती आहे का दुधात काही गोष्टी मिसळून प्यायल्याने तुम्हाला दुहेरी फायदा मिळू शकतो. दूधामध्ये विविध घटकांचा समावेश करणे फक्त दुधाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पुढील काही पदार्थ आहेत आहेत जे तुम्ही दूधाबरोबर किंवा दुधात मिसळून खाऊ शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मध : दूधात मध घालून पिणे हे एक उत्तम आरोग्यदायी पेय असते. मधामध्ये अँटीऑक्सिडंटस, अँटीबॅक्टेरीयल आणि अँटीफंगल घटक असतात जे शरीर सुदृढ ठेवण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
हळद : सर्दी आणि ताप यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी हळदीच्या दूधाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. एक ग्लास कोमट दूधात एक चमचा हळद मिसळा आणि दुधाचे सेवन करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
दालचिनी : दूधात दालचिनी मिसळून प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते. दालचिनीयुक्त दूधामुळे शरीराची रोप्रतिकारक क्षमता सुधारते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
बदाम : बदाम आणि दूध प्यायल्याने अनेक आरोग्य फायदे होतात. हे मिश्रण त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
खजूर : दूधात खजूर मिसळून प्यायल्यास आरोग्यास फायदा होतो. रक्त, मसल्स आणि शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी हे फायदेशीर ठरते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
केशर : केशर दूध प्यायल्याने मुलांना चांगली व गाढ झोप लागते. मूड आणि झोप नियंत्रित करण्याचे काम करते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
वेलची : वेलची दूधात उकळवून त्यात मध मिसळून रात्री झोपण्यापूर्वी त्याचे सेवन करा. त्यामुळे तुमचे शरीर आतून मजबूत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL