-
तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी योग्य स्किनकेअर रूटीनचे पालन करणे आवश्यक आहे. त्वचेची काळजी (स्किन केअर) घेण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टींचा वापर करण्यात येतो. त्यापैकी एक म्हणजे टोनर आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
हिवाळा सुरू झाली की, बहुतांश लोकांची त्वचा कोरडी आणि रुक्ष होते. असे म्हंटले जाते की, चमकदार आणि निरोगी त्वचा मिळविण्यासाठी दिवसातून दोनदा तरी टोनर चेहऱ्यावर लावणे फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
टोनर सर्व प्रकारच्या त्वचेसाठी चांगले असते.त्वचेच्या प्रकारानुसार बाजारात टोनर उपलब्ध असतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर चेहऱ्यासाठी टोनर वापरण्याचे काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. तुमची त्वचा हायड्रेट राहते : टोनरमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट आणि चेहरा मॉइश्चरायझ करण्यात मदत करतात. या सर्व गोष्टींमुळे तुमची त्वचा कोरडी (ड्राय) होत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. तुमची त्वचा फ्रेश दिसते : टोनर लावल्याने तुमचा चेहरा फ्रेश दिसू लागतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. त्वचेवरील तेल आणि घाण काढून टाकते : टोनर्स चेहऱ्यावरील अतिरिक्त घाण, तेल आणि मेकअप काढून टाकण्यास मदत करतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. टोनर तुमच्या त्वचेची पीएच पातळी देखील संतुलित करतात.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. त्वचेचे रक्षण करते : टोनरमुळे तुमच्या त्वचेला पोषण मिळते. तसेच हे त्वचेवरील पोअर्स स्वच्छ करण्याचे काम करते. (फोटो सौजन्य: @Freepik)

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस