-
जर तुम्ही साहसी गोष्टींची आवड असेल तर स्कूबा डायव्हिंग हा तुमच्या आयुष्यातील एक उत्तम अनुभव असू शकतो. अलीकडेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुजरातच्या पंचकुई समुद्रावर स्कूबा डायव्हिंगचा आनंद लुटला. (photo – @freepik)
-
यानिमित्ताने आता भारतातील प्रसिद्ध स्कूबा डायव्हिंग ठिकाणांबद्दल चर्चा होत आहे. त्यामुळे भारतातील अशाच ५ बेस्ट स्कूबा डायव्हिंग ठिकाणांबद्दल जाणून घेऊ… (photo – @freepik)
-
अंदमान – भारतातील अंदमान हे स्कुबा डायव्हिंगसाठी सर्वाधिक प्रसिद्ध ठिकाणींपैकी एक आहे. येथील समुद्रच्या तळाशी नेत्रदीपक कोरल रीफ्स, जहाजांचे तुकडे आणि विविध प्रकारचे समुद्री जीव पाहण्याचा एक वेगळा आनंद घेता येतो. (photo – @freepik)
-
लक्षद्वीप – लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत असाल तर तिथे स्कुबा डायव्हिंग करायला विसरू नका. तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वात सुंदर कधीही न पाहिलेल्या क्षणांचा अनुभव घेता येईल, स्वच्छ निळाशार समुद्र, त्यात पोहणारे वेगवेगळे जीव पाहता येतात. (photo – @freepik)
-
तुम्ही प्रिन्सेस रॉयल, लॉस्ट पॅराडाईज, डॉल्फिन रीफ, क्लासरूम, फिश सूप आणि मांटा पॉइंट येथे अगदी ४ ते ७ हजार रुपयांमध्ये डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता (photo – @freepik)
-
गोवा – ऑक्टोबर किंवा मे महिन्यात तुम्ही गोव्याला गेलात तर तुम्ही इथल्या नाईट लाईफसोबतच सी लाइफचा आनंद घेऊ शकता. Suzy’s Wreck, Sail Rock, Davy Jones Locker, Grand Island, Shelter Cove आणि turbo tunnel divers ही लोकप्रिय ठिकाण आहेत. येथे स्कुबा डायव्हिंगसाठी तुम्हाला फक्त ५ हजार रुपये खर्च करावे लागतील. (photo – @freepik)
-
कर्नाटक – जर तुम्हाला समुद्री कासव, स्टिंग्रे आणि अगदी व्हेल शार्क पहायचे असतील तर कर्नाटकातील नेत्राणी बेटावर डायव्हिंग करा. येथे तुम्हाला ५००० रुपयांमध्ये स्कूबा डायव्हिंगचा सुंदर अनुभव घेता येईल. (photo – @freepik)
-
पाँडिचेरी – पाँडिचेरीमध्ये स्कूबा डायव्हिंग वर्षभर सुरू असते. तसेच हे भारतातील सर्वोत्तम अंडरवॉटर डायव्हिंग डेस्टिनेशनमध्ये समाविष्ट आहे. येथे तुम्ही कूल शार्क रीफ, अरविंद की दीवार, टेंपल रीफ यांसारख्या ठिकाणी डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता. यासाठी तुम्हाला ६ ते ८ हजार रुपये खर्च करावे लागतील. (photo – @freepik)
