-
भारतामध्ये लिंबाची लागवड सर्व प्रदेशांमध्ये केली जाते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
लिंबू स्वादाने आंबट-गोड असूनही बहुगुणी आणि उपयोगी फळ आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
लिंबाचे संत्री, सरबती, इडलिंबू असे प्रमुख प्रकार आढळतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
वर्षभर उत्पादन देणारे पीक म्हणून लिंबाकडे पाहिले जाते. तर आज आपण लिंबू आणि लिंबाच्या सालीचे फायदे जाणून घेणार आहोत. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असतात. त्यामुळे लिंबामधील फायबरचा पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयोग केला जातो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
लिंबाच्या सालींचा वापर तुम्ही बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर सारख्या नॅचरल क्लिनिंग घटकांसह केल्यास ते जंतुनाशक म्हणून काम करू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
लिंबाच्या झाडाच्या पानांपासून चहा सुद्धा बनवला जातो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
अनेकदा जेवण्याच्या भांड्याला आतून चिवटपणा राहतो. एखादा पदार्थ करपला की, भांड्याच्या तळाला डाग राहतात अशावेळी लिंबाच्या सालीने भांडी घासली की, चिवटपणा लगेच निघून जातो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
कुकरमध्ये भात शिजवताना कुकर आतून काळा पडतो. अशावेळी खाली पाण्यासोबत लिंबाची एक साल देखील ठेवा. सालीमुळे कुकर आतून काळा होत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
लिंबाचा रस रुचकर व पाचक असल्याने आमटी, भाजी, लोणचं, सरबत, मुरंबा आदी विविध पदार्थांसाठी याचा वापर केला जातो. (फोटो सौजन्य: @Freepik )

माजी भाजपा नेत्याबरोबर ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये दिसणारी महिला नेमकी कोण?