-
सामोसा, पराठे, आप्पे, कटलेट या भारतीय पदार्थांबरोबर हमखास खाल्ला जाणार चटपटीत पदार्थ म्हणजे ‘केचअप, सॉस.’ (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, दुकानातून विकत घेतलेल्या केचअप, सॉसमध्ये साखरेचा समावेश असतो का? (फोटो सौजन्य: @Freepik)
-
सॉसचा समावेश तुमच्या पदार्थाला चविष्ट बनवत असला तरीही त्या पदार्थांमध्ये असणाऱ्या साखरेच्या जास्त सेवनाने अनेक समस्यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मसाले पदार्थांची चव वाढवतात. पण, त्यात साखरसुद्धा मिसळली जाते. त्यामुळे लोकप्रिय सॉस आणि केचअपमधील साखरेचे प्रमाण चॉकलेट बार किंवा सोड्याच्या कॅनला सुद्धा टक्कर देऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
द इंडियन एक्स्प्रेसने योगा इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर हंसाजी योगेंद्र यांच्याबरोबर या विषयावर चर्चा केली आणि हायलाइट केलं की, भारतीय नागरिक नकळत वर्षभरात फक्त सॉस आणि केचअपसारख्या मसाल्यांमधून २० किलोग्रॅम साखर खात असतात.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यामुळे असे पदार्थ खरेदी करताना पदार्थांचे लेबल्स काळजीपूर्वक वाचावे ; ज्यामुळे मसाल्याच्या बाटल्यांमध्ये साखर लपलेली आहे की नाही हे ओळखणे सोपे जाईल; असे डॉक्टर हंसाजी म्हणाले. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
शर्करायुक्त मसाल्याचे सेवन केल्याने कॅलरीजचे प्रमाण, वजन वाढणे आणि लठ्ठपणा वाढणे आदी समस्या उद्भवतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
शर्करायुक्त मसाले दातांच्या आरोग्याला धोका निर्माण करतात, ज्यात दात किडणे आणि पोकळी वाढणे इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
शर्करायुक्त मसाल्यांच्या अति सेवनामुळे ऊर्जा क्रॅश होण्यास मार्ग मिळतो ; ज्यामुळे एखाद्याला आळशीपणासुद्धा जाणवू शकतो; असे डॉक्टर हंसाजी म्हणतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
अगं बाई! साडीतील काकूंचा ठुमका पाहून थक्क झाले नेटकरी; VIDEO पाहून म्हणाले “आंटी तर लहानपणी…..