-
अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहापासूनच होते. चहा घेतलं की शरीराचा थकवा दूर होतो. अशीच अनेकांची मानसिकता आहे.
-
चहा ही एक सवय आहे जी बऱ्याच लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.
-
तुम्हीही चहाचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
-
तुम्ही रोज दुधाचा चहा पिता तेव्हा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो, याचा कधी विचार केला आहे का?
-
हंग्री कोआला येथील वरिष्ठ पोषणतज्ज्ञ इप्सिता चक्रवर्ती यांनी याबाबत माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
-
दररोज दुधाचा चहा प्यायल्याने दुधात असलेल्या कॅल्शियममुळे तुमची हाडे थोडी मजबूत होऊ शकतात.
-
चहा रोज सेवन केल्यावर ते तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करण्यात मदत करू शकते. पण, जास्त प्रमाणात कॅफिनमुळे चिंता, अस्वस्थता आणि झोप लागणे कठीण होऊ शकते.
-
जास्त प्रमाणातील चहाच्या संयुगांच्या सेवनामुळे तुमच्या शरीराचा लोह शोषून घेण्याच्या क्षमतेमध्ये समस्या निर्माण होऊ शकते.
-
चहामध्ये साखर असल्याने आणि नियमितपणे प्यायल्याने त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो आणि टाइप २ मधुमेहासारख्या आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.
-
खरंतर, दुधाचा चहा एक स्वादिष्ट आणि आनंददायक पेय असू शकतो, परंतु तुम्ही तो किती वेळा पिता आणि तुम्ही कोणता प्रकार निवडता हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
-
जास्त प्रमाणात दुधाचा चहा पिऊ नका. जेव्हा शक्य असेल तेव्हा साखरेशिवाय किंवा कमी साखरेचा चहा प्या.
-
तुम्हाला पचनाचा त्रास होत असेल तर दुधाचा चहा टाळणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले राहिल. (Photos-freepik)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case