-
उच्च रक्तदाबामुळे अनेक समस्या होऊ शकतात. यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि यकृता संबंधित गंभीर समस्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
-
रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी काही खाद्यपदार्थ आणि पेये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. तुम्ही घरी सोप्या पद्धतीने हे उपाय करू शकता. निरोगी जीवनशैलीसह, या पेयांचा आपल्या आहारात समावेश केल्याने, उच्च रक्तदाब प्रभावीपणे व्यवस्थापित आणि कमी होऊ शकतो. जाणून घेऊया याबाबत.
-
तुम्ही घरी जास्वंदाच्या फुलांचा चहा करू शकता. जास्वंदामध्ये अँथोसायनिन्स आणि इतर अँटिऑक्सिडंट असतात जे रक्तवाहिन्यांना आराम देण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. यामधील विशेष पदार्थ गुणधर्म शरीरातून अतिरिक्त सोडियम काढून टाकण्यास मदत करते.
-
डाळिंबाच्या रसामध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात विशेषतः पॉलिफेनॉल आणि टॅनिन. डाळिंबाचा रस रक्त प्रवाह सुधारतो आणि हृदयाच्या आरोग्यास समर्थन देखील देतो. यामधील दाहक-विरोधी गुणधर्म शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.
-
बीटरूटच्या रसामध्ये नायट्रेट्सचे प्रमाण जास्त असते जे रक्तवाहिन्यांना आराम देण्यास मदत करते. बीटरूटचा रसा यकृताच्या आरोग्यास समर्थन देऊन तुमचे पचनही सुधारू शकते.
-
टोमॅटोमध्ये पोटॅशियम आणि लाइकोपीन सारख्या अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, म्हणूनच टोमॅटोचा रस रक्तदाब कमी करण्यास मदत करतो. हे हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते.
-
ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी सारख्या बेरीमध्ये फ्लेव्होनॉइड्स भरपूर असतात, जे रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास मदत करतात. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे तुम्हाला निरोगी ठेवते. या विशेष पेयांचा आहारात समावेश केल्यास रक्तदाब कमी होतो आणि एकूणच आरोग्य चांगले राहते.
-
आधीक माहितीकरिता तज्ञांच्या सल्ला घ्या. (सर्व फोटो : अनस्पलॅश)
