-
हवामानात बदल होताच तुम्हाला सर्दी, खोकला होत असेल तर रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे म्हंटले जाते. साहजिकच खोकल्यामुळे तुमच्या दैनंदिन कामावर वाईट परिणाम होऊ शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर गर्भवती मसाबा गुप्ताने काही दिवसांपूर्वी असे सांगितले की, तिला खोकला, सर्दी, रक्तसंचय ही सर्व लक्षणे बरे करण्यासाठी ओवा गरम करून तो रुमालात घालून, त्याचा बटवा बनवून त्याचा वास घेते. (फोटो सौजन्य: @Pixabay / इन्स्टाग्राम / @masabagupta)
-
या हेल्थ हॅकबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने आयुर्वेदिकतज्ज्ञ डॉक्टर अंशु वात्स्यायन आणि पोषणतज्ज्ञ ईशा लाल यांच्याशी संवाद साधला. दोघांनीही मान्य केले की, ओव्याचा बटवा हा घरगुती उपाय गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
आयुर्वेदिकतज्ज्ञ डॉक्टर अंशु वात्स्यायन म्हणाले की, हा ओव्याचा बटवा शरीर व डोकेदुखी बरं करू शकते. हा बटवा तयार करण्यासाठी तुम्ही ओव्याच्या बिया तव्यावर भाजून किंवा कोमट पाण्यात भिजवून घेऊ शकता. बटवा बनवण्यासाठी ओवा अर्धा चमचापेक्षा जास्त घेऊ नका; अशी त्यांनी शिफारस केली आहे. (फोटो सौजन्य: @Pixabay)
-
ओव्याचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत? सगळ्यात पहिला पचनास मदत : ओव्यामध्ये थायमॉल नावाचे संयुग असते, जे गॅस्ट्रिक रस स्राव करते, अपचन आणि ब्लोटिंग (पोट फुगण्याची समस्या) कमी करण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
श्वसनास आराम : ओव्याचे प्रतिजैविक गुणधर्म सर्दी, खोकला आणि रक्तसंचय कमी करण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
वेदनांपासून त्वरित आराम : ओवा त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे सांधेदुखी, स्नायू, पायात पेटके येणे शांत करू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
अँटीमायक्रोबिल : ओव्यातील थायमॉल संइन्फेक्शनचा सामना करते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तसेच पोषणतज्ज्ञ ईशा लाल यांनी सांगितले की, गर्भवती महिला आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा सुरक्षितपणे ओव्याचा बटवा वापरू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल