-
अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमी चाहत्यांबरोबर देशी जुगाड शेअर करत असते. अलीकडेच वोग इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सकाळी गरम पाण्यात आले, हळद, लिंबू व मध घालून पिण्याचा सल्ला दिला. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
हा घरगुती उपाय खरोखर आरोग्यासाठी उपयोगी ठरेल का? हे जाणून घेण्यासाठी दी इंडियन एस्क्प्रेसने नोएडा येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख आहारतज्ज्ञ सुहानी सेठ अग्रवाल यांच्याशी चर्चा केली. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
डॉक्टरांनी या घरगुती उपायाचे फायदे सांगितले आहेत आणि आलं, मध, लिंबू कशाप्रकारे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकते हे स्पष्ट केलं आहे. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
आल्यामध्ये दाहकविरोधी अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म असतात; जे जळजळ, ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याव्यतिरिक्त आले पचन व रक्ताभिसरणासाठी मदत करते; जे संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
हळदीमध्ये कर्क्युमिन समृद्ध घटक आणि शक्तिशाली विरोधी दाहक गुणधर्म असतात. कर्क्युमिनचे अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकार शक्तीसुधारण्यास मदत करतात; ज्यामुळे ते या पेयाचा एक मौल्यवान घटक ठरतात, असे आहारतज्ज्ञ सुहानी सेठ अग्रवाल यांनी स्पष्ट केले. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
तसेच लिंबामध्ये असणारे क जीवनसत्त्व शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींच्या वाढीसाठी मदत करते. शरीराच्या संरक्षणासाठी पांढऱ्या रक्तपेशी महत्त्वाची भूमिका बजावतात. पांढऱ्या रक्तपेशी संसर्गाच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
तर मध हा त्याच्यातील नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्मांमुळे शरीराचे एखाद्या संसर्गाची बाधा होण्यापासून संरक्षण तर करतोच; पण घशाचे खवखवणेदेखील शांत करतो. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
हा जुगाड खरंच रोगप्रतिकार शक्ती वाढवतो का? तर यावर उत्तर देत डॉक्टर म्हणाल्या की, हे पेय संतुलित आहार किंवा वैद्यकीय उपचारांचा पर्याय म्हणून घेतले जाऊ शकत नाही. पण, याचे फायदेही चांगले आहेत. त्यामुळे निरोगी दिनचर्येचा एक भाग म्हणून नियमित सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू वाढू शकते. (फोटो सौजन्य : @Freepik )
-
याचा अर्थ असा की, प्रियांका चोप्रा रोज सकाळी जे पेय पितात, ते सामान्य आरोग्यासाठी योगदान देऊ शकते. पण, गंभीर आरोग्य समस्यांसाठी हा उपाय योग्य ठरू शकत नाही. (फोटो सौजन्य : @Freepik )

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा