-
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानले जाते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठरावीक काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, ३० मे २०२५ रोजी शुक्राने वृषभ राशीत प्रवेश केला असून तो या राशीत २८ जूनपर्यंत राहील. हा काळ काही राशींसाठी अधिक फायदेशीर असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राच्या राशी परिवर्तनाचा शुभ प्रभाव मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातदेखील पाहायला मिळेल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राच्या राशी परिवर्तनाने कर्क राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींना खूप सकारात्मक परिणाम देणारे ठरेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राच्या राशी परिवर्तनाने सिंह राशीच्या व्यक्तींना अनुकूल परिणाम पाहायला मिळतील. या काळात कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : हा लेख मिळालेल्या माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल