-
रताळे (स्वीट पोटॅटो) या पदार्थाकडे अनेकजण केवळ एक साइड डिश म्हणून पाहतात. परंतु, पौष्टिकतेच्या बाबतीत हे एक पॉवरहाउस आहे. विशेष म्हणजे आरोग्यदायी फायद्यांच्या बाबतीत स्वीट पोटॅटो हा पोटॅटोपेक्षा (बटाटा) अनेक बाबतीत उत्तम आहे. फायबर, अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी (आयर्न) समृद्ध असलेले हे कंदमूळ दररोज थोडे-थोडे खाल्ल्यास तुमच्या आरोग्यास अनेक लाभ मिळतील. एक महिना तुमच्या आहारात रताळे समाविष्ट केल्यास शरिरात काय बदल घडतील ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (PC : Unsplash)
-
रक्तातील साखरेची पातळी
रताळ्याचा कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि फायबर साखरेचे शोषण कमी करतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते, जे प्रीडायबेटिक आणि मधुमेहींसाठी फायदेशीर आहे.(PC : Unsplash) -
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी आणि मँगनीजने भरलेले रताळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि सामान्य आजारांपासून जलद बरे होण्यास मदत करतं.(PC : Unsplash) -
मेंदू मजबूत करण्यास मदत
जांभळ्या रताळ्यांमध्ये अँथोसायनिन्स असतात, जे स्मरणशक्ती सुधारू शकतात, मेंदूच्या पेशींचं नुकसान होण्यापासून वाचवू शकतात आणि कालांतराने संज्ञानात्मक कार्याला बळ देऊ शकतात.(PC : Unsplash) -
शाश्वत ऊर्जा प्रदान करते
रताळ्यातील कॉम्प्लेक्स कार्ब्स हळूहळू ऊर्जा पुरवतात, ज्यामुळे तुम्ही दिवसभर सक्रिय आणि उत्साही राहता, जे व्यस्त दिनचर्या किंवा वर्कआउटसाठी आदर्श आहे.(PC : Unsplash) -
हृदयाचे आरोग्य सुधारते
पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे, रताळे रक्तदाब नियंत्रित करण्यास, शरिरात द्रवपदार्थ टिकवून ठेवण्यास प्रतिबंध करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.(PC : Unsplash) -
वजन व्यवस्थापनास मदत होते
उच्च फायबरमुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे सतत भूक लागत नाही आणि नैसर्गिकरित्या निरोगी वजन कमी होण्यास मदत होते.(PC : Unsplash)
प्रचंड पैसा, नवं घर, नोकरी…१५ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचे नशीब खुलणार; बुध अस्त योगानं भरभराट होणार, पिढ्यानं पिढ्या होतील समृद्ध