-
भारतात मधुमेहींची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत मधुमेह रोखण्यासाठी देशाचा आरोग्य विभाग प्रयत्न करत असतानाच आपणही आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जेवणातील साखरेचं प्रमाण कमी केलं पाहिजे. रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवतील असे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांची माहिती देणार आहोत जे तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढवू शकतात. तसेच हे पदार्थ तुम्ही वारंवार खात राहिलात तर तुम्हाला टाइप २ मधुमेह होऊ शकतो. (Photo Source : Unsplash)
-
तळलेले पदार्थ/स्कॅक्स : बटाटावडा, समोसा, पकोडे आणि चिप्स हे पदार्थ अनहेल्दी फॅट्सनी भरलेले असतात, जे वजन वाढवणे आणि इन्सुलिन प्रतिकारता वाढविण्यास कारणीभूत ठरतात. (Photo Source : Unsplash)
-
ग्रॅनोला : आरोग्यदायक व प्रोटीन रिच पदार्थ म्हणून विकले जाणारे सीरियाल्स आणि बार्समध्ये (अतिरिक्त साखर/Added Sugar वापरून बनवलेली एक प्रकारची चिक्की) साखर असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. (Photo Source : Unsplash)
-
प्रोसेस्ड मीट (प्रक्रिया केलेलं मांस) : सॉसेज, बेकन आणि सलामे यांसारख्या पदार्थांमध्ये सोडियम आणि नाइट्रेट्स असतात, ज्यामुळे टाईप २ मधुमेहाच्या धोका वाढतो. (Photo Source : Unsplash)
-
सोडा, कॉकटेल्स व कोल्ड्रिंक्स : या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिरिक्त साखर असते, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोज झपाट्याने वाढतं आणि पॅन्क्रियाजवर जास्त ताण पडतो. (Photo Source : Unsplash)
-
व्हाइट ब्रेड : मैदा हा शरिरासाठी फार चांगला पदार्थ नाही. तो पचायलाही जड असतो. तसेच त्यात साखरही असते. तसेच या मैद्यापासून बनवल्या जाणाऱ्या ब्रेडमध्ये अजून साखर मिसळली जाते. तसेच बिस्किटं व नान हे देखील पटकन ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. (Photo Source : Unsplash)
-
सफेद तांदळाचा भात : उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेला सफेद तांदूळ अधिक प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. (Photo Source : Unsplash)

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बूट फेकण्याच्या घटनेवर अखेर मौन सोडलं; म्हणाले, “त्या घटनेमुळं…”