-
काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. ट्विटरवर ७ ट्वीट्सच्या माध्यमातून काँग्रेसने मोदी सरकारवर क्लीन चिट फॉर्म्युल्याची गोष्ट म्हणते गंभीर आरोप केले आहेत.
-
या आरोपांमध्ये गुजरात दंगलीपासून सोहराबुद्दीन चकमकीपर्यंतच्या प्रकरणांचा समावेश आहे. यात मोदी सरकारने त्यांना क्लीन चिट देणाऱ्यांच्या नियुक्ती महत्त्वाच्या पदावर केल्याचा आरोप काँग्रेसने केला.
-
१. आर. के. राघवन यांनी नरेंद्र मोदींना गुजरात दंगलींमध्ये क्लिन चिट दिली. त्यांना सायप्रसचे उच्चायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलं.
-
२. न्यायमूर्ती सदाशिवम यांनी तुलसी प्रजापती बनावट चकमक प्रकरणात अमित शाह यांच्यावरील गुन्हा रद्द केला. त्यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली.
-
३. के. व्ही. चौधरी यांनी सहारा बिर्ला प्रकरणात मोदी आणि इतर भाजपा नेत्यांना क्लीन चिट दिली. त्यांना मुख्य सतर्कता आयुक्त म्हणून नियुक्ती झाली.
-
४. राकेश अस्थाना यांनी मोदी-शाह यांच्या इशाऱ्यावर अनेक प्रकरणं कमकुवत केली. त्यांची सीबीआयचे विशेष संचालक व दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक झाली.
-
५. यू. यू. ललित यांनी सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात अमित शाह यांचे वकील म्हणून काम केलं. ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले.
-
६. वाय. सी. मोदी यांनी गुलबर्ग सोसायटी हत्याकांड व हरेन पांड्या प्रकरणात नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिली. त्यांची एनआयए प्रमुखपदी नियुक्ती झाली.
-
७. न्यायमूर्ती सुनील गौर यांनी पी. चिदंबरम यांच्या अटकेचा रस्ता मोकळा केला. त्यांची पीएमएलएचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.
कतरिना कैफ ४२ व्या वर्षी झाली आई, विकी कौशलने दिली गुड न्यूज, माधुरी दीक्षित कमेंट करत म्हणाली…