-
शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत असा पुनरुच्चार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर जळगाव आणि वाशीमच्या शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या विधानावर बोट ठेवलं. जे पी नड्डा यांनी शिवसेना संपण्याच्या मार्गावर असल्याचं विधान केलं होतं, त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांनाही लक्ष्य केलं.
-
राजकारणात विजय आणि पराभव होत असतो, पण आता संपवण्याची भाषा केली जात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
अनेक आव्हानं पायदळी तुडवत आम्ही झेंडा रोवला आहे असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
-
“दोन ते तीन पातळ्यांवर आपली लढाई सुरु आहे. रस्त्यावरील लढाईत आपण काही कमी पडणार नाही. कोर्टातही सुनावणी सुरु आहे. तिसऱी लढाई म्हणजे शपथपत्र आणि सदस्य नोंदणी आहे. विषय गंभीर असून अर्ध्यात सोडू नका,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं.
-
न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
“आजपर्यंत अनेकदा शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले, पण आता संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत,” असं सांगत उद्धव ठाकरेंनी जे पी नड्डा यांच्या वक्तव्यावर टीका केली.
-
बंड याआधीही झाले असून मी त्यांना सामोरं गेलो आहे. हे बंड थंड करण्याची ताकद माझ्याकडे आहे. पण आता राजकारणात तुम्हाला मुळापासून संपवण्याचा डाव आखला जात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
“आपण सर्वांनी प्रेमाने, मायेने निष्ठेचं दूध पाजलं, पण औलाद गद्दारच राहिली,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
-
“नागाला कितीही दूध पाजलं, तरी चावायचं तो चावतोच,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी लक्ष्य केलं.
-
“वाशीममध्ये भांडणं मिटवता मिटवता आपल्या नाकी नऊ आले होते, तरी आपण त्यांना सांभाळलं होतं. आपण त्यांना सगळं काही दिलं होतं,” अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
-
“जळगावमध्ये भाजपाने गुलाब पाहिला, पण आता सैनिकाचे काटे पाहायचे आहेत. एक गुलाब गेलं पण दुसरे गुलाबराव वाघ आपल्यासोबत आहेत,” असं सांगत उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं.
-
(File Photos)

सर्वार्थ सिद्धी योगाचा प्रभाव तुमच्या राशीच्या कुंडलीत काय बदल घडवणार? कोणाच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार? वाचा तुमचे राशिभविष्य