-
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतच सत्ताधाऱ्यांवर टीका केली
-
महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांची खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेली असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा- अजित पवार
-
तसेच आपला शेतकरी राजा कसा उभा राहील यासाठी तातडीची मदत जाहीर करावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
-
राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी. यासाठी उद्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची वेळ मागितली आहे. त्यांच्याकडे हे विषय मांडणार आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
-
मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करतो, असे सरकारने सांगितले होते. मात्र अद्याप पैसे जमा केलेले नाहीत.- अजित पवार
-
सध्या शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे- अजित पवार
-
राज्य सरकारमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात आले, तरच लोकांना दिलासा मिळेल असेही अजित पवार म्हणाले.
-
पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. वाहतुकीकडे कुणाचे लक्ष नाही. वाहतूककोंडीबाबत पोलिसांना विश्वासात घेण्याची गरज आहे- अजित पवार
-
पुण्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. याकडे लक्ष द्यायला हवे- अजित पवार
-
राज्यातील जनतेची शंभर रुपयात दिवाळी गोड करणार, असे सरकारमार्फत जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी एका कंपनीला काही कोटीचे कंत्राट दिले आहे. मात्र अद्याप जनतेपर्यंत शिधा पोचलेला नाही- अजित पवार
-
पारदर्शकपणे व माफक दरात लोकांना हा शिधा मिळावा अशी अपेक्षा आहे. मात्र यात काहीतरी गौडबंगाल आहे, असेही बोलले जात असल्याचे अजित पवार म्हणाले.
-
राज्यात बेरोजगारी, महागाई वाढली आहे. नुसती भरती होणार आहे, अशा घोषणा सरकार करत आहे. तरुण याकडे डोळे लावून आहेत- अजित पवार
-
शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे. याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.
-
या सरकारला शंभर दिवस झाले, तरी लोकप्रतिनिधींना आपण काय बोलतोय आणि कसे बोलतोय याचे तारतम्य राहिलेले नाही. शिवाय अधिकार्यांशी उर्मट भाषेत बोलले जात आहे.- अजित पवार
-
ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला.
-
अजित पवार यांना शिखर बँक घोटाळा प्रकरणावर भाष्य केले. आतापर्यंत अनेकवेळा चौकशी झाली. प्रत्येकवेळी अजित पवार यांचं नाव येतं. मात्र बाकीच्या ७५ जणांचं नाव येत नाही.- अजित पवार
-
आता सरकार त्यांचे आहे. त्यांनी काय चौकशी करायची तर करावी. याआधी सहकार विभाग, निवृत्त न्यायाधीश, सीआयडी, एसीबी, ईओडब्ल्यू यांनी चौकशी केली होती.- अजित पवार
-
मी एक नागरिक आहे. मी संविधान, कायदा मानणारा आहे. चौकशी करताना मला जी प्रश्न विचारली जातील त्यांना उत्तरं देण्याची माझी तयारी आहे.- अजित पवार
-
कुठलेही सरकार नव्हते तेव्हा एसीबीने या प्रकरणात क्लीनचीट दिली होती. तेव्हा राज्यपाल यांच्याकडे कार्यभार होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मी ३ दिवसांच्या सरकारची स्थापना केली होती. पण राजीनामा दिल्यानंतर ते पडले, असा संदर्भ अजित पवार यांनी दिला.

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला