-    राष्ट्रवादीकडून खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली आहे. अशातच प्रफुल्ल पटेल यांनी मोठा धक्का देत नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. 
-    “जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त केलं आहे. त्यांच्याऐवजी सुनिल तटकरे नवे प्रदेशाध्यक्ष असतील,” अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. 
-    उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 
-    प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मी जयंत पाटलांना अधिकृतरित्या कळवलं आहे की, प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांना मुक्त करतो. त्यांच्याजागी सुनिल तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहे.” 
-    “अपात्रतेची कारवाई पक्षाद्वारे होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाकडे याचा अधिकार नाही.” 
-    “अजित पवार यांची विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात येत आहे.” 
-    “अनिल पाटील यांनाच पुढेही प्रतोद ठेवण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून कळवलं आहे,” असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. 
-    सुनिल तटकरे यांनीही नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी सुरज चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. 
-    प्रवक्तेपदी अमोल मिटकरी, सुरज चव्हाण आणि उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. ( सर्व फोटो साभार – गणेश शिरसेकर, इंडियन एक्स्प्रेस ) 
 
  उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  