-
अजित पवार पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होतील की माहिती नाही. पण, लवकर अजित पवार मुख्यमंत्री होणार आहेत, असा दावा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
-
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राजकारणात असलेल्यांना कधी ना कधी संधी मिळणार आहे.”
-
“अजित पवार त्यांच्या पक्षातील मोठे नेते आहेत.”
-
“त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी आमच्या शुभेच्छा निश्चित त्यांच्या पाठिशी आहेत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
-
“पण, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, आणि मुख्यमंत्रीच राहणार आहेत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
-
“एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालीच आम्ही पुढील निवडणुकांना सामोरे जाणार आहोत,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
-
दरम्यान, संधी मिळाल्यावर अजित पवारांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी एका कार्यक्रमात केलं होतं.
-
सहा महिन्यात अजित पवार मुख्यमंत्री होतील, या चर्चेबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पहिली बाब म्हणजे सहा महिन्यांत कोणत्याही गोष्टी बदलत नाहीत.”
-
“अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवायचं असेल, तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू. जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करू,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ( संग्रहित छायाचित्र )

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा