-
रिपब्लिकन पार्टी इंडिया (आठवले) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या कुटुंबियासह बँकॉकचा दौरा केला.
-
या दौऱ्यानिमित्त त्यांनी बँकॉकच्या निळ्याशार समुद्रकिनारी काही निवांत क्षण घालवले.
-
आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रामदास आठवले यांनी या दौऱ्याचे फोटो शेअर केले आहेत. तसेच फोटोखाली “बँकॉक समुद्र किनारा..” असे कॅप्शनही दिले आहे.
-
रामदास आठवले हे त्यांच्या शिघ्रकवितांसाठी लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या एका फॉलोअरने या फोटोंखाली एक शिघ्रकविता पोस्ट केली.
-
“मी खातो बँकॉकचा वारा… मी खातो बँकॉकचा वारा… लोकसभेच्या प्रचारला नाही जानार, आता वाजले की बारा…”, अशी मजेशीर कविता पोस्ट करून राजकारण आणि पर्यटन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न या युजरने केला आहे.
-
रामदास आठवले यानी काही दिवसांपूर्वी लक्षद्विपचाही दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांचे लक्षद्विपच्या प्रशासनाने शासकीय इतमामात स्वागत केले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्विपचे फोटो पोस्ट केल्यानंतर काही आठवड्यातच रामदास आठवले यांनीही दौरा करत लक्षद्विपच्या समुद्रकिनाऱ्यांचा आस्वाद घेतला.
-
आपल्या पत्नी आणि मुलासह रामदास आठवले यांनी लक्षद्विपच्या समुद्र किनाऱ्याचा आनंद लुटताना एक कविता केली.
-
“दुनिया मे मै जहाँ भी जाऊंगा, वहाँ मै समंदर मे देखुंगा शिप, तो मुझे याद आयेगा लक्षद्वीप”, अशी कविता रामदास आठवले यांनी लक्षद्वीपबद्दल केली.
-
लक्षद्वीपच्या दौऱ्यात पर्यटनासह त्यांनी काही सामाजिक उपक्रमही घेतले. येथील एका दिव्यांग शिबिरात त्यांनी मोफत सहाय्यक उपकरणांचे वाटप केले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच रामदास आठवले आणि त्यांच्या मुलाने लक्षद्वीपमध्ये स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटला. याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case