-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ९ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे अबू धाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे स्वागत केले. (REUTERS फोटो)
-
दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारून हस्तांदोलन केले. (पीटीआय फोटो)
-
यानंतर पंतप्रधानांनी हैदराबाद हाऊसमध्ये अबुधाबीच्या क्राउन प्रिन्स यांच्यासोबत बैठक घेतली. (पीटीआय फोटो)
-
दरम्यान, शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची क्राउन प्रिन्स म्हणून ही पहिलीच भारत भेट आहे. त्यांचा हा अधिकृत दौरा आहे. (पीटीआय फोटो)
-
क्राउन प्रिन्स राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत आणि राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन देखील करणार आहेत. (पीटीआय फोटो)
-
८ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे आगमन झाल्यानंतर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शेख खालिद बिन मोहम्मद यांचे विमानतळावर औपचारिक स्वागत केले. (पीटीआय फोटो)
-
युएई सरकारचे अनेक मंत्री आणि व्यापारी शिष्टमंडळ क्राऊन प्रिन्स यांच्या सोबत भारत दौऱ्यावर आलेले आहे. (पीटीआय फोटो)
-
१० सप्टेंबर रोजी, क्राउन प्रिन्स मुंबईत येणार आहेत, जिथे ते भारत आणि UAE या दोन्ही देशांतील प्रमुख उद्योजकांबरोबर व्यवसाय मंचात सहभागी होतील. (REUTERS फोटो)
-
या वर्षी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएईला भेट दिली होती. त्यांनी UAE क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी भारत-UAE द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली आणि आठ करारांची देवाणघेवाण केली होती. (पीटीआय फोटो)
हेही वाचा:

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल