-
ब्रिटनचा राजकुमार हॅरी आणि मेगन मार्कल शनिवारी विवाहबद्ध झाले. सेंट जॉर्ज चॅपेलमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं होतं.
-
चांगल्या आणि वाईट काळात, गरीबीत आणि श्रीमंतीत, आरोग्यात आणि अनारोग्यात, जोपर्यंत काळ मला तुझ्यापासून हिरावत नाही, तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन, असं म्हणत प्रिन्स हॅरीनं मेगनसोबत आजन्म लग्नबंधनात अडकण्याची शपथ घेतली.
-
मेगन मार्कलनेही या शपथेचा पुनरुच्चार करत वेडिंग रिंग्स एक्स्चेंज केल्या.
-
कॅलिफोर्नियात राहणारी ३६ वर्षांची मेगन मार्कल टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री आहे.
-
मेगन आणि हॅरीची प्रेमकहाणी कोणा एका परिकथेप्रमाणेच आहे असे म्हणायल हरकत नाही.
-
एका मित्राने त्या दोघांनाही ‘ब्लाइंड डेट’वरही पाठवले होते. त्यावेळी ते दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. किंबहुना हॅरीने मेगनचे नावही कधीच ऐकले नव्हते.
-
मेगन मार्कल आणि त्यांची आई डोरिया राग्लँड
-
२०१६ पासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते.
-
अखेर शनिवारी हॅरी आणि मेगनच्या ‘रॉयल अफेयर’ला एक नवी ओळख मिळाली.
-
सेंट जॉर्ज चॅपेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.
-
मेगन मार्कल
-
प्रिन्स हॅरी- मेगन मार्कल
-
लग्नानंतर गाडीतून फिरताना प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल
-
मेगनच्या गाऊनच्या ट्रेलवर कॉमनवेल्थच्या ५३ देशांच्या फुलांची नक्षी काढण्यात आली होती.
-
मेगनच्या ब्राइड्समेड्स आणि पेज बॉईज
रोहित-विराट संघात नाही, अभिषेक शर्माची निवड तर तिलक वर्मा कर्णधार, ‘या’ वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा