-
राणीबागेतील मिस्टर मोल्ट या पेंग्विनचा आज तिसरा वाढदिवस आहे. हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
-
दोन वर्षापूर्वी जुलै महिन्यात दक्षिण कोरियाहून आठ पेंग्विन वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आणण्यात आले होते. त्यातील मोल्ट हा एक आहे.

हे पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईतील तसेच देशभरातील नागरिकांची मोठी गर्दी होत असते. -
मुख्य म्हणजे नुकतेच मोल्ट-फ्लिपर या जोडीने नुकतेच अंडे दिले आहे. हे अंड उबविण्याचे काम दोघेही आळीपाळीने करत आहेत.
-
यासाठी राणीबागेतील पेंग्विन कक्षाचा दर्शनी भाग विशेष सजविण्यात आला आहे.
-
मुख्य कक्षामध्ये अंडे असल्यामुळे डॉक्टरांनी विशेष काळजी घेऊन केवळ बाहेरच्या भागाची सजावट केली आहे. याबरोबरच मोल्टचा प्रवास उलगडणारी चित्रफीत दाखवली जात आहे.
रोहित-विराट संघात नाही, अभिषेक शर्माची निवड तर तिलक वर्मा कर्णधार, ‘या’ वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा