-
आपल्या देशाच्या विकासात पाश्चात्य देशांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. पाश्चात्य संशोधकांमार्फत लावल्या गेलेल्या बल्ब, रेल्वे, कंप्यूटर, मोबाईल फोन, इंटरनेट तसेच युद्धात वापरली जाणारी शस्त्रे यांसारख्या अनेक आवाक् करणाऱ्या शोधांमुळे आज आपण झपाट्याने प्रगती करत आहोत. मात्र एक प्रश्न तुम्हा सर्वांना नक्कीच पडत असेल की जगाने आपल्याला इतकं काय काय दिलं, मग आपण जगाला काय दिलं? या फोटो गॅलरीत भारतीयांनी लावलेले १४ शोध पाहाणार आहोत ज्यामुळे संपूर्ण जगाची दिशाच बदलली.
-
बटण – बटण ही गोष्ट अगदी शुल्लक वाटते. मात्र तरीही आपल्या जगण्यातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आज कपड्यांपासून विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तूंपर्यंत आणि मोबाईलपासून युद्धात वापरल्या जाणाऱ्या ऑटोमॅटिक शस्त्रांपर्यंत सर्व ठिकाणी बटणांचा वापर केला जातो. अगदी घरातील दिवे सुरु करण्यासाठी सुद्धा बटणच दाबावे लागते. या बटणाचा शोध भारतीयांनी लावला आहे. ५० हजार वर्षांपूर्वी मोहेंजो दारोच्या सिंधू संस्कृतीत या बटणाचा शोध लागला होता.
-
शाम्पू – केस सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी आज संपूर्ण जग शाम्पूचा वापर करते. या शाम्पूचा शोध भारतात लागला आहे. १७६२ साली मुघल साम्राज्यात पहिल्यांदा शाम्पू वापरण्यात आला. त्यानंतर भारतात आलेल्या ब्रिटिशांनी या शाम्पूला पाश्चात्य देशांमध्ये नेले आणि आज संपूर्ण जग अंघोळी करताना या शाम्पूचा वापर करते.
-
योग – तन आणि मन तंदरुस्त ठेवण्यासाठी योग अत्यंत गुणकारी आहे. अनेकदा डॉक्टर आपल्या पेशंटला ड्रिप्रेशन किंवा रोजच्या ताण तणावातून बाहेर येण्यासाठी योग करण्याचा सल्ला देतात. तसेच अनेक मोठमोठे कलाकार, खेळाडू, शास्त्रज्ञ देखील योग करतात. या योगाचा शोध ५ हजार वर्षांपूर्वी भारतीयांनी लावला आहे.
-
वायरलेस कम्यूनिकेशन – स्मार्टफोन, ब्लू टूथ, ब्लू टूथ स्पिकर, लॅपटॉप अशी अनेक वायरलेस यंत्रे आज आपण वापरतो. या वायरलेस तंत्रज्ञानाचा शोध गुल्येल्मो मार्कोनी यांनी लावला असे म्हटले जाते. परंतु त्यांच्याही आधी १८९५ साली भारतीय संशोधक जगदिश चंद्र बोस यांनी वायरलेस तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले होते. परंतु त्यांनी हा शोध पेटंट केला नव्हता. त्यामुळेच वायरलेस यंत्रांचं श्रेय गुल्येल्मो मार्कोनी यांना मिळते.
-
सुती कपडे – भारतात चौथ्या शतकापासूनच कापसाची शेती केली जात आहे. जेव्हा संपूर्ण जग प्राण्यांच्या कातडीपासून तयार केलेले कपडे वापरत होता. तेव्हा भारतीय लोक कापसापासून तयार केलेले सूती कपडे वापरत होते. भारतानेच जगाला कॉटनचे कपडे तयार करण्याची कला शिकवली.
-
साखर – साखर हा आज जगभरातील खाद्यसंस्कृतीतील अत्यंत महत्वाचा पदार्थ आहे. चहा, बुंदिचे लाडू, रसगुल्ला, गुलाब जामुन इथपासून डोनट्स, केक आणि आईसक्रीमपर्यंत सर्व गोड पदार्थांमध्ये साखरेचा वापर केला जातो. या साखरेचा शोध भारतीयांनी लावला. १३५० पासूनच आपल्या देशात उसापासून साखरेची निर्मिती केली जात आहे. भारतीयांनीच जगाला साखर या अनोख्या पदार्थाची निर्मिती करायला शिकवले.
-
USB (Universal Serial Bus) – USB चा वापर स्मार्ट फोन, लॅपटॉप, विविध प्रकारचे इलेक्ट्रनिक गॅजेट चार्ज करण्यासाठी केला जातो. तसेच डेटा ट्रान्सफर करण्यासाठी USBचा वापर केला जातो. USB हे आज जगातील सर्वाधिक वापरल्या इलेक्ट्रनिक डिव्हाइजपैकी एक आहे. इंटेल कंपनीत काम करणाऱ्या अजय भट्ट या भारतीय संशोधकाने USBचा शोध लावला होता. आणि आज या USB शिवाय कुठलेच संगणकीय यंत्र काम करु शकत नाही.
-
फायबर ऑप्टिक्स – फायबर ऑप्टिक्स हे आज जगातील सर्वाधिक अध्ययावत तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते. अगदी टेलिकम्यूनिकेशन, रिमोट सेंसिंग कंप्यूटर नेटवर्किंगपासून अंतरिक्ष यानांपर्यंत सर्व ठिकाणी या फायबर ऑप्टिक्सचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानाचा शोध अमेरिकेत काम करणाऱ्या एका भारतीय संशोधकाने लावला आहे. त्यांचे नाव डॉ नरिंदर सिंह कपानी. त्यांना आज फायबर ऑप्टिक्सचे पिता म्हणून संपूर्ण जग ओळखते.
-
चतुर्भुज समीकरण (Quadratic Equation) – २ हजार वर्षांपूर्वी आर्यभट्ट या गणित तज्ञाने चतुर्भुज समीकरणाचा शोध लावला होता. या गणितीय समीकरणाचा, वापर त्रिकोणमितीय, भूमिती, संख्या सिद्धांत इथपासून खगोलशास्त्रापर्यंत सर्व प्रकारची गणिते सोडवण्यासाठी केला जातो.
-
मोतीबिंदू शस्त्रक्रिया – मोतीबिंदू आजही जगातील सर्वात जटिल शस्त्रक्रिया म्हणून ओळखली जाते. याचा शोध इ. स.पूर्व सहाव्या शतकात भारतीय वैद्यकतज्ज्ञ सुश्रुत यांनी लावला होता. त्यांनीच जगातील पहिली मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करुन दाखवली होती.
-
प्लास्टिक शस्त्रक्रिया – आज जगभरातील अनेक लोक आणि कलाकार अधिक सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक शस्त्रक्रियेचा आधार घेतात. या शस्त्रक्रियेचा शोध देखील इ. स.पूर्व सहाव्या शतकात भारतीय वैद्यकतज्ज्ञ सुश्रुत यांनी लावला होता.
-
टॉयलेट फ्लश – शौचालयांची रचना आणि सांडपाण्याची व्यवस्था कशी करावी याचे तंत्र भारतीयांनीच संपूर्ण जगाला शिकवले. ५० हजार वर्षांपूर्वी मोहेंजो दारोच्या सिंधू संस्कृतीत सांडपाण्याची विल्हेवाट कशी करावी यावर पहिल्यांदा प्रयोग करण्यात आले होते.
-
संख्यालेखन पद्धती (decimal number system) – युरोपात भारतीय दशमान संख्यालेखन पद्धती पोहोचण्यापूर्वी तेथे रोमन संख्यालेखन पद्धती वापरली जात होती. परंतु एका ठरावीक संख्येनंतर रोमन सख्यांमध्ये मोजमापन करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे मग भारतीय गणित तज्ज्ञांनी निर्माण केलेल्या दशमान संख्यालेखन पद्धतीचा वापर जगभरात करण्यास सुरुवात झाली. पुढे याच संख्यालेखनाचा वापर करुन अल्बर्ट आइनस्टाइन, निकोला टेस्ला, थॉमस एडिसन यांसारख्या अनेक संशोधकांनी आवाक् करणारे शोध लावले.
-
शून्य – मानवी प्रगतीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे शून्य ही गणिती संकल्पना! या शून्याचा शोध महान भारतीय गणिततज्ज्ञ आर्यभट्ट यांनी लावला होता. जगातील बहुतेक प्राचीन संस्कृतींमध्ये वस्तू मोजण्यासाठी हातापायांच्या बोटांवरून अंक अस्तित्वात आले. अंक दर्शविण्यासाठी चिन्हेही वापरली जाऊ लागली. परंतु प्रत्येक संख्येसाठी वेगळे चिन्ह वापरणे अशक्य झाल्याने, बोटांच्या संख्येनुसार दहा दहाचे गट करणे सोयीचे ठरले. यातूनच भारतीय उपखंडात दशमान पद्धती जन्माला आली. या पद्धतीला पूर्णत्व आले ते शून्यामुळे! याच शून्याचा वापर आज संपूर्ण जग करते. अगदी भौतिकशास्त्रापासून खगोलशास्त्रापर्यंत सर्व प्रकारच्या वैज्ञानिक संशोधनांमध्ये व मानवाच्या प्रगतीमध्ये शून्याचा सिंहाचा वाटा आहे. या शून्यामुळेच आज मानव पृथ्वीवरील सर्वात प्रगत प्राणी म्हणून ओळखला जातो असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आणि याचे संपूर्ण श्रेय जाते ते भारतीयांनाच.

नितीन गडकरींनी सरन्यायाधीश गवईंना दिला ‘आदेश’, त्यांच्याकडून लगेच मान्यही….