-
मुलांना योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांना योग्य पद्धतीनं गोष्टी समजावून सांगणं महत्वाचं असतं. पण कधीकधी पालक त्यांच्या मुलांच्या कृतींवर रागावतात. पण रागावल्यामुळे त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होतो. (Photo: Pexels)
-
अनेर लहान मुलांना क्षुल्लक गोष्टींवरून राग येतो. त्यामुळे यावर काही सोपे उपाय आहेत जे तुमच्या मुलाला लवकर शांत करण्यास आणि त्यांच्या रागाची सवय सोडण्यास मदत करू शकतात. (Photo: Pexels)
-
जर तुमचं मूल रागावलं असेल तर मुलाला रागाने बोलण्याऐवजी त्याला शांत होण्यासाठी थोडा वेळ घ्या. मुलाला जवळ घ्या आणि शांत रहा. काही वेळाने जेव्हा तो शांत होईल, तेव्हा त्याला समजावून सांगा. (Photo: Freepik)
-
तुमच्या मुलाने राग व्यक्त केला तर त्याच्यासोबत थोडा वेळ बसा. त्याला त्यांचं ऐकतात असं वाटेल. नंतर, रागावू न देता ते कसे बोलावे ते समजावून सांगा. (Photo: Pexels)
-
रागाच्या वेळी मुलाच्या दोन्ही खांद्यावर प्रेमाने हात ठेवा आणि त्याला असं वाटू द्या की तुम्ही त्याला समजून घेता आणि त्याच्यासोबत आहात. (Photo: Pexels)
-
तुमच्या मुलाला थोडा वेळ जवळ घ्या, प्रेमाने बोला. यामुळे त्यांना सुरक्षित आणि आरामदायी वाटेल. काही काळानंतर त्यांचा राग प्रेमात बदलेल. (Photo: Pexels)
-
कधीकधी मुले खूप थकलेली किंवा झोपलेली असतानाही रागावतात. अशा परिस्थितीत त्यांच्या रागाचं कारण ओळखणं महत्वाचं आहे. (Photo: Pexels)
-
तुमच्या मुलाला खेळ, धावणे, सायकलिंग, योग आणि ध्यान यासारख्या गोष्टीत सहभागी करा. यामुळे मन शांत होण्यास मदत होते आणि राग कमी होतो. (Photo: Pexels)
-
जर तुमच्या मुलाला क्षुल्लक गोष्टींवरून राग येत असेल, तर त्यावर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना चांगल्या गोष्टी करण्यास प्रोत्साहित करणं. खरं तर, मुलांच्या चांगल्या कृत्यांचं कौतुक केल्याने ते अधिक आनंदी होतात.(Photo: Pexels)
IND vs AUS: “मला पुढच्या पिढीला सांगायचंय…”, रोहित शर्माचं सामनावीर-मालिकावीर ठरल्यानंतर मोठं वक्तव्य; म्हणाला, “मी पहिल्यांदा संघात..”