-
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध एक मोठा विक्रम केला आहे. वास्तविक, यशस्वी जैस्वालने केवळ १३ चेंडूत ५० धावांचा आकडा गाठला. आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे.
-
के.एल. राहुलने आयपीएल २०१८ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध केवळ १४ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. आयपीएलमधील हे सर्वात वेगवान अर्धशतक होते. त्याचा हा विक्रम यशस्वी जैस्वालने तोडला.
-
पॅट कमिन्सने केकेआरसाठी आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध १४ चेंडूत अर्धशतक ठोकले. आयपीएलच्या वेगवान पन्नास खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या स्थानावर होता पण आता तो तिसऱ्या स्थानावर आहे.
-
युसूफ पठाण देखील कोलकाताकडून खेळला आणि हैदराबाद विरुद्ध १५ चेंडूत अर्धशतक केले. युसूफने २०१४ च्या आयपीएलमध्ये ही कामगिरी केली होती.
-
सुनील नारायण आयपीएल२०१७ मध्ये आरसीबी विरुद्ध १५ चेंडूत अर्धशतक केले होते. केकेआरकडून खेळताना नारायणने हे अर्धशतक झळकावले होते.
-
लखनऊ सुपर जायंट्स संघातील कॅरेबियन खेळाडू निकोलस पूरनने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध याच आयपीएल२०२३ मध्ये १५ चेंडूत धडाकेबाज अर्धशतक झळकावले.
-
सुरेश रैनाने २०१४ मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध १६ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. रैना तेव्हा चेन्नई सुपर किंग्सकडून खेळायचा.
-
इशान किशनने २०२१ मध्ये मुंबईकडून खेळताना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध १६ चेंडूत अर्धशतक केले होते.
-
ख्रिस गेलने १७ चेंडूत अर्धशतक केले आहे. २०१३ च्या आयपीएलमध्ये त्याने आरसीबीच्या वतीने पुणे वॉरियर्सविरुद्ध हे अर्धशतक केले होते.

रोहित शर्मा, कोहली पहिल्याच सामन्यात अपयशी ठरल्यानंतर सुनील गावस्कर यांचं मोठं विधान; म्हणाले, “तर आश्चर्य वाटणार नाही…”