-
गुढीपाडवा
सगळीकडेच आज गुढीपाडव्याचा सण साजरा केला जात आहे. यामध्ये भारताच्या माजी क्रिकेटर झहीर खाननेही पत्नी सागरिकासोबत हा सण साजरा केला. (फोटो: सागरिका घाटगे इन्स्टाग्राम) -
फोटो
सागरिका घाटगेने गुढीपाडवा सणाचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. -
नैवेद्याचं ताट
गुढीपाडव्यासाठीच्या नैवेद्याच्या ताटात पुरणपोळीचा बेत आहे, तर सोबतच या फोटोच्या पोस्टमध्ये सागरिकाने पुरणपोळीसोबतच शिरकुर्माही बनवला असल्याचा उल्लेख केला आहे. -
गुलाबी
आजच्या गुढीपाडवा सणासाठी या दोघांनीही गुलाबी रंगाचे कपडे घातले असून पिंक थीम केली आहे. -
सण
झहीर खानच्या घरी सर्वच सण समारंभ हे मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. ज्याचे फोटो त्याची पत्नी सागरिका सोशल मिडियावर शेअर करत असते. -
मराठमोळी
झहीर खानची पत्नी मराठमोळी सागरिका घाटगे ही कोल्हापूरच्या राजघराण्याची लेक आहे. तर झहीर खान हा मूळचा अहमदनगरमधील श्रीरामपूरचा आहे. -
वेगवेगळे धर्म
जहीर आणि सागरिका हे दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आचरण करत असले तरी दोन्ही धर्माचे सण हे एकत्र साजरे करतात. सोशल मिडियावर चाहतेही दोघांचे खूप कौतुक करताना दिसतात.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल