-
इन्स्टाग्राम अकाऊंटवरून भावूक पोस्ट शेअर करून विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. (Photo: ICC/ Social Media)
-
”टीम इंडियाची कसोटी कॅप परिधान करून मला १४ वर्ष झाली. खरं सांगू तर, हा प्रवास मला कुठे नेईल, याची मला काहीच कल्पना नव्हती. या प्रारुपाने माझी परीक्षा पाहिली, मला घडवलं आणि आयुष्यभरासाठी शिदोरी दिली.”, अशा भावना त्याने यावेळी व्यक्त केल्या आहेत. (Photo: ICC/ Social Media)
-
त्याने पुढे लिहिले की, ” टीम इंडियासाठी कसोटी खेळणं हे माझ्यासाठी नेहमीच खास होतं. या फॉरमॅटपासून दूर जाण्याचा निर्णय मुळीच सोपा नव्हता, पण योग्य वाटतो. मी या खेळासाठी सर्वकाही दिलं. त्याहून अधिक या खेळाने मला परत दिलं. कृतज्ञ भावनेने भरलेल्या हृदयानं मी कसोटीचा प्रवास थांबवतोय.” (Photo: ICC/ Social Media)
-
दरम्यान कसोटीतील विराट पर्वाच्या शेवटानंतर त्याच्या जागी भारतीय संघात कोणता खेळाडू येऊ शकतो यावर एक नजर टाकूया. (Photo: ICC/ Social Media)
-
करुण नायर
या यादीत करुण नायर अव्वल स्थानावर आहे. नायरने २०१७ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तो टीम इंडियामध्ये परतण्याची वाट पाहत आहे. (Photo: Instagram) -
कसोटीमध्ये तिहेरी शतक
२०२४-२५ च्या रणजी ट्रॉफीमध्ये नायर उत्तम फॉर्ममध्ये होता. तो वीरेंद्र सेहवागनंतर कसोटीत त्रिशतक करणारा दुसरा भारतीय खेळाडू आहे. (Photo: Instagram) -
साई सुदर्शन
भारतीय युवा फलंदाज साई सुदर्शन देखील कोहलीच्या जागी खेळू शकतो. साईने आयपीएलच्या सध्या सुरू असलेल्या हंगामात ११ सामन्यांमध्ये ५०९ धावा केल्या आहेत. (Photo: Instagram) -
ध्रुव जुरेल
२४ वर्षीय ध्रुव जुरेल गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्ध चांगल्या फॉर्ममध्ये होता. आतापर्यंत त्याने ४ कसोटी सामन्यांमध्ये ४०.४० च्या सरासरीने २०२ धावा केल्या आहेत. (Photo: Instagram) -
रजत पाटीदार
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार देखील कसोटीत कोहलीची जागा घेऊ शकतो. (Photo: Instagram) -
देवदत्त पडिक्कल
या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्फोटक फलंदाज देवदत्त पडिकलचाही समावेश आहे. त्याने २ कसोटी सामन्यांमध्ये ३०.०० च्या सरासरीने ९० धावा केल्या आहेत. दरम्यान, विराटच्या जागी संघात कोणला संधी मिळेलं हे काही येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. (Photo: Instagram)

शिकवणी न लावताही पुण्यातील रावी नामजोशीने मिळवले दहावीत पैकीच्या पैकी गुण