-
भारताच्या कसोटी संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांनाच धक्का दिला. विराटच्या कसोटी निवृत्तीनंतर अनेक आजी माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केलं.
-
विराट कोहली हा जगातील उत्कृष्ट कसोटी खेळणाऱ्या फलंदाजांपैकी आहे. दरम्यान अचानक कसोटी निवृत्तीनंतर पत्नी अनुष्काबरोबर विराट वृंदावनला पोहोचला होता.
-
अनष्का शर्मानेही विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर भावूक करणारी पोस्ट शेअर करत त्याचं कसोटी क्रिकेटप्रति असणारी आत्मीयता तिने दाखवून दिली होती.
-
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर वृंदावन येथील प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते.
-
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेत त्यांच्यासह बसले असताना अनुष्का भावुक झाली होती.
-
विराट आणि अनुष्काशी प्रेमानंद महाराज चर्चा करत असताना अनुष्का भावुक झालेली दिसली आणि तिच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.
-
अनुष्काशिवाय विराट कोहलीनेच्या हातातील एका वस्तूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
-
विराट कोहली जेव्हा प्रेमानंद महाराजांसमोर बसला होता, तेव्हा त्याच्या हातात काऊंटर दिसला. हा काऊंटर देवनामाचा जप करण्यासाठी वापरला जातो.
-
विराट अनुष्का १३ मे म्हणजे आज सकाळी प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी पोहोचले होते आणि लगेच दिल्ली एअरपोर्टला परतून ते तिथून मुंबईत दाखल झाले. (सर्व फोटो सौजन्य -विरल भय्यानी पापराझी पेज इन्सटाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल