-
IPL 2025: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्ज संघाने आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. (Photo: BCCI)
-
पंजाब किंग्जने क्वालिफायर २ सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला आणि ११ वर्षांनंतर अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. (Photo: BCCI)
-
आता पंजाबचा संघ उद्या ३ जूनला होणाऱ्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना करणार आहे. (Photo: BCCI)
-
श्रेयस अय्यरने पंजाबच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. त्याच्या आतापर्यंतच्या आयपीएल प्रवासाबद्दल जाणून घेऊ… (Photo: BCCI)
-
दिल्ली कॅपिटल्स (२०१५-२०२१)
अय्यरने २०१५ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स,म्हणजेच आताच्या दिल्ली कॅपिटल्स संघातून आयपीएलचा प्रवास सुरू केला. (Photo: BCCI) -
श्रेयसने त्याच्या खेळातून त्याचे महत्व दाखवून दिले, श्रेयस त्याच्या स्टायलिश फलंदाजी आणि सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखला जातो. (Photo: BCCI)
-
त्याने तीन हंगामांसाठी संघाचे नेतृत्व केले आणि २०२० मध्ये संघाला अंतिम फेरीत नेले. (Photo: BCCI)
-
कोलकाता नाईट रायडर्स (२०२२-२०२४)
२०२२ मध्ये अय्यर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) मध्ये सामील झाला आणि कर्णधाराची भूमिका स्वीकारली. (Photo: BCCI) -
ज्यात २०२४ च्या आयपीएल हंगामात त्यांना विजय मिळाला. त्याने संघाच्या यशात मोलाची भूमिका बजावली, त्याने त्याचे नेतृत्व आणि फलंदाजीचे कौशल्य सिद्ध केले. (Photo: BCCI)
-
पंजाब किंग्ज (२०२५)
यंदाच्या २०२५ आयपीएल लिलावात, अय्यरला पंजाब किंग्ज (पीबीकेएस) ने मोठ्या रकमेला विकत घेतले आणि २०२५ च्या हंगामासाठी तो कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करेल अशी घोषणा करण्यात आली. (Photo: BCCI) -
तो आता पंजाब किंग्जचा कर्णधार आहे. केकेआरमधून बाहेर पडल्यानंतर त्याला पंजाब किंग्जने लिलावात २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. काही माध्यमांद्वारे श्रेयसचे कोलकाता संघातून बाहेर पडण्याचे कारण संवादाचा अभाव सांगण्यात आले होते. (Photo: BCCI)
-
दरम्यान, श्रेयस आता पंजाबला पहिल्यांदा चॅम्पियन बनवू शकेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Photo: BCCI) हेही पाहा-जितेश शर्माच्या प्रेमाची गोष्ट; मराठी मुलीबरोबर लग्न, काय करते पत्नी? जाणून घ्या…

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग