-
बीसीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय वनडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. तर रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येणार आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
रोहितची वनडे संघाचा कर्णधार म्हणून कारकिर्द संपली आहे. दरम्यान कसा आहे रोहित शर्मा, विराट कोहली आणि एमएस धोनीचा वनडे कर्णधार म्हणून रेकॉर्ड? जाणून घ्या. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
रोहित शर्माने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत विजय मिळवून दिला होता. ही स्पर्धा कर्णधार म्हणून त्याची शेवटची स्पर्धा ठरली. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
रोहित शर्माने २०२१ मध्ये वनडे संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. त्याला ५६ वनडे सामन्ंयांमध्ये भारताचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. यादरम्यान भारतीय संघाने ४२ सामने जिंकले. तर १२ सामने गमावले.कर्णधार म्हणून विजयाची सरासरी ७५ टक्के इतकी होती. रोहितच्या नेतृ्त्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, तर वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
एमएस धोनीला २०० वनडे सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. यादरम्यान भारतीय संघाने ११० सामने जिंकले, तर ७४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर ५ सामने बरोबरीत राहिले आणि ११ सामने रद्द झाले. धोनीची विजयाची सरासरी ५५ टक्के इतकी होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
विराट कोहलीला कर्णधार म्हणून ९५ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान भारताने ६५ सामने जिंकले, तर तर २७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. विराटच्या नेतृत्वात विजयाची सरासरी ६८.४२ इतकी होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

मोठी बातमी : पुण्यात आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण