-
सारा तेंडुलकरने नुकताच तिचा २८वा वाढदिवस साजरा केला, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेचा विषय असते. सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
-
साराच्या केकवर लिहिलेल्या शब्दांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे, ज्यावर ‘Twenty Ate’ असं लिहिलं आहे.
-
साराने केकबरोबरही एकापेक्षा एक पोज देत फोटो शेअर केले आहेत. साराच्या या पोस्टवर चाहत्यांना लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
सारा तेंडुलकरने तिच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन तिच्या खास मैत्रिणींबरोबर केलं आहे.
-
साराने या फोटोमध्ये तिची होणारी वहिनी म्हणजेच अर्जुन तेंडुलकरबरोबर साखरपुडा झाल्याची चर्चा असलेली सानिया चंडोकदेखील आहे.
-
सानिया चंडोक ही अर्जुन तेंडुलबरोबर साखरपुडा झाल्याची बातमी आल्यापासून अनेकदा तेंडुलकर कुटुंबाबरोबर दिसली होती. इतकंच नव्हे तर ती तेंडुलकर कुटुंबासह सहलीलादेखील गेली होती..
-
त्याचबरोबर सारा तेंडुलकरने नुकत्याच सुरू केलेल्या पिलाटे्स अकादमीच्या उद्घाटन सोहळ्याला ती संपूर्ण तेंडुलकर कुटुंबासह उपस्थित असल्याचे फोटोही समोर आले होते.
-
सानिया चंडोक ही सारा तेंडुलकरची वहिनी असण्याबरोबरच खूप खास मैत्रिणदेखील आहे. साराने तिच्याबरोबर यापूर्वीही अनेक फोटो शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य-@SaraTendulkar Instagram)

“अजय देवगण १८ वर्षांपासून माझ्याशी बोलत नाही, माझ्या करिअरमधील सर्वात वाईट…”