-
व्हॉट्सअॅप हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. इन्स्टंट मेसेजिंग अॅप असणारे व्हॉट्सअॅप आज अगदी साध्या गप्पांपासून ते कामाच्या गोष्टींसाठीही वापरले जात आहे. त्यामुळेच व्हॉट्सअॅपकडूनही कायमच वेगवेगळे नवीन फिचर्स अपडेट केले जातात. (सर्व फोटो प्रातिनिधिक)
-
व्हॉट्सअॅपने नुकतीच आपल्या ब्लॉगमधून अशीच काही नव्या घोषणा केल्या आहे. कंपनीने नवीन फिचर्स लॉन्च केले आहे. जाणून घेऊयात या नवीन फिचर्सबद्दल…
-
व्हॉट्सअॅपने नव्या ब्लॉग पोस्टमध्ये पुढील काही आठवड्यांमध्ये टप्प्याटप्प्यांमध्ये नवीन अपडेट नुसार काही फिचर्स युझर्सला वापरता येणार आहेत. याचा अर्थ असा की व्हॉट्सअॅपचे नवीन अपडेट्स हवे असल्याने लेटेस्ट अपडेटेड व्हर्जन युझर्सच्या फोनमध्ये असणं गरजेचं आहे. नवीन व्हर्जन असेल तरच हे फिचर्स युझर्सला दिसतील.
-
स्टीकर्स पॅक: लोकं हल्ली स्टीकर्सच्या माध्यमातून संवाद साधण्याचे प्रमाण वाढले आहे. हीच गोष्ट लक्षात घेत व्हॉट्सअॅपने स्टीकर्स पॅक लॉन्च केल्याची घोषणा केली आहे.
-
व्हिडिओ कॉलचे नवे फिचर: व्हॉट्सअॅपने आपल्या ग्रुप व्हिडिओ कॉल फिचरमध्येही बदल केला आहे. टॅप आणि होल्डवर व्हिडिओ कॉलमध्ये नवीन व्यक्तीला अॅड करण्याबरोबरच आता फूल स्क्रीनचा वापर करुन व्हिडिओ कॉल करता येणार आहे.
-
व्हिडिओमध्ये हा पर्याय मिळणार: व्हिडिओ कॉलवरुन एकावेळी आठ लोकांना संवाद साधता येईल. त्याच वेळी बोलता बोलता एखाद्या व्यक्तीची विंडो एक्सपांड करुन ती स्क्रीनवर मोठ्या आकारात दिसण्याचा पर्यायही उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
-
साध्या फोनवरही स्टेटस: केएआय ऑप्रेटींग सिस्टीमवर चालणाऱ्या मोबाइलवर व्हॉट्सअॅप स्टेटस अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. हे स्टेटस स्मार्टफोनप्रमाणे २४ तास दिसतील. म्हणजेच आता जिओच्या फोनवरुनही स्टेटस अपलोड करता येणार आहे.
-
एका क्लिकवर व्हिडिओ कॉल: आता व्हॉट्सअॅपवर ग्रुप व्हिडिओ कॉल अगदी एका क्लिकवर शक्य होणार आहे. ग्रुपमधील सर्व व्यक्तींना एकाच वेळी कॉल करण्यासाठी ग्रुप आयकॉनजवळच व्हिडिओ कॉलचा पर्याय देण्यात येणार आहे.
-
व्हॉट्सअॅप नव्या अपडेटमध्ये लॅपटॉप आणि वेबसाठी डार्क मोडचा पर्याय देणार आहे.
-
क्यूआर कोडने सेव्ह करा नंबर: नंबर सेव्ह करण्यासाठी आता पूर्ण नंबर टाइप करुन तो सेव्ह करण्याची गरज नाही. आता केवळ क्यूआर कोड स्कॅन करुन थेट युझर्स एखाद्याचा क्रमांक सेव्ह करु शकतात. प्रत्येक युझरचा वेगळा क्युआर कोड असेल.

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक