-
आज आम्ही तुमच्यासाठी दहा लाखांपेक्षाही कमी किंमत असलेल्या आणि स्टॅंडर्ड म्हणून सहा एअरबॅगसह असलेल्या पाच कारची यादी घेऊन आलो आहोत.
-
मारुती सुझुकी अल्टो के१०
मारुती सुझुकी अल्टो के१० ही भारतातील सर्वात लोकप्रिय कारपैकी एक आहे. ही हॅचबॅक, जी आता लॉर्ड अल्टो म्हणून प्रसिद्ध आहे, परवडणारी किंमत आणि ६ एअरबॅग्जने ही कार सुसज्ज आहे. मारुती सुझुकी अल्टो के१० ची एक्स-शोरूम किंमत ४.२३ लाख रुपये ते ६.०९ लाख रुपये आहे.
(छायाचित्र: फायनान्शियल एक्सप्रेस) -
मारुती सुझुकी इको
मारुती सुझुकी इको ही देखील एक लोकप्रिय प्रवासी कार आहे. ३-सीटर लाइनसह उपलब्ध असलेली सर्वात स्वस्त मारुती सुझुकी इको आता ६ एअरबॅग्जने सुसज्ज आहे. ही कार सीएनजीमध्ये देखील उपलब्ध आहे. मारुती सुझुकी इकोची किंमत ५.४४ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टाॅप व्हेरिएंट मॉडेलसाठी ६.७० लाख रुपयांपर्यंत जाते. (छायाचित्र: फायनान्शियल एक्सप्रेस) -
मारुती सुझुकी सेलेरियो
मारुती सुझुकीने फेब्रुवारीमध्ये सेलेरियोला अपग्रेड दिले. सेलेरियो कार आता ६ एअरबॅग्जसह येते. मारुती सुझुकी सेलेरियोची एक्स-शोरूम किंमत ५.६४ लाख ते ७.३७ लाख रुपयांपर्यंत आहे. (छायाचित्र: फायनान्शियल एक्सप्रेस) -
मारुती सुझुकी वॅगन आर
२०२४-२५ या आर्थिक वर्षात मारुती सुझुकी वॅगनआर ही सर्वाधिक विक्री होणारी कार होती आणि या हॅचबॅकची मागणी सतत वाढत आहे. ही कार आता सहा एअरबॅग्जसह येते. मारुती सुझुकी वॅगनआरची एक्स-शोरूम किंमत ५.६५ लाख ते ७.३६ लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
(छायाचित्र: फायनान्शियल एक्सप्रेस) -
ह्युंदाई ग्रँड आय१० निओस
या यादीत स्थान मिळवणारी ह्युंदाई ग्रँड आय१० निओस ही हॅचबॅक ३० हून अधिक सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. ज्यात ६ एअरबॅग्ज, ड्रायव्हर रीअर व्ह्यू मॉनिटर (DVRM), इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), वाहन स्थिरता व्यवस्थापन (VSM), हिल असिस्ट नियंत्रण इत्यादींचा समावेश आहे. ह्युंदाई ग्रँड आय१० निओस कारची एक्स-शोरूम किंमत ५.९८ लाख ते ८.३८ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. (छायाचित्र: फायनान्शियल एक्सप्रेस)

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ‘ही’ एक १० रूपयांची छोटी गोष्ट खरेदी केल्यानेही वाढेल सुख-समृद्धी