-
करोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. १० दिवसांच्या या लॉकडाउनमधील सुरुवातीचे काही दिवस कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. पुणेकरांना विनाकारण घराबाहेर पडण्यावर बंदी आहे. यादरम्यान पोलीस यंत्रणेवरची जबाबदारी पुन्हा वाढली आहे. (सर्व छायाचित्र – अरुल होरायझन)
-
शासनाच्या नियमानंतरही काही पुणेकर हे बाईकवरुन घराबाहेर पडत आहेत, पुण्यातील कात्रज चौकात पोलिसांनी नाकाबंदी करत सर्वांची कसून चौकशी करायला सुरुवात केली आहे.
-
अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही या काळात घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. ज्या लोकांकडे अधिकृत पास आणि कारण आहे त्यांची चौकशी करुन त्यांना सोडलं जातंय.
-
करोना प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाउन करणं गरजेचं असल्याचं शासनाने स्पष्ट केलं. त्यामुळे एखादा व्यक्ती विनाकारण घराबाहेर दिसला की पोलीस आपल्या नेहमीच्या कडक आवाजात कुठे निघालात, व्हा घरी…असं दरडवताना दिसत आहेत.
-
त्यामुळे पुणेकरांनो विनाकारण घराबाहेर पडण्याचा विचारही करु नका, घरातच थांबा आणि करोनाची साखळी तोडा.

IND vs ENG: “ड्रॉसाठी तयार राहा”, ब्रूकने गिलला मैदानात डिवचलं; शुबमनने कमालीचं उत्तर देत बोलतीच केली बंद; पाहा VIDEO