-
प्रातिनिधीक छायाचित्र/गणेश शिर्सेकर
-
पावसामुळं पाणी साचल्याने अनेक ऑफिसेस बंद ठेवण्यात आली होती. तर अत्यावश्यक सेवेसाठी सुरु असलेल्या लोकल ट्रेनची वाहतुकही ठप्प झाली होती.
-
नागरिकांनाही या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत होती.
-
उड्डाणपूल उतरतानाच मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबून राहिल्याने काही काळ वाहतुकही ठप्प झाली होती.
-
रस्त्यावर साचलेल्या पाण्यात कार निम्मी बुडाल्याने तिनंही नियंत्रण गमावलं होतं.
-
किंग्ज सर्कल भागातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून ठिकठिकाणी पाणी तुंबल्याचे दिसून आले. या भागातील कार्यालयेही त्यामुळे बंद ठेवावी लागली होती.
-
पाण्यात बंद पडलेली बस ढकलून मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्न करताना नागरिक.
-
ऑफिससाठी घराबाहेर पडल्यानंतर तुफान पावसामुळे कंबरेपर्यंत साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना एक तरुण.
-
रस्त्यातील ड्रेनेज खुले करुन साचलेलं पाणी जाण्यासाठी मार्ग काढताना महापालिकेचा कर्मचारी.
-
साचलेल्या पाण्यात पूर्णपणे बुडालेली दुचाकी हाताने ढकलत नेताना या तरुणाची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.
-
मुसळधार पाऊस झाल्याने मुख्य रस्त्यांवर असं पाणी साचलं होतं.
-
यावेळी सायकलवरुन वस्तू घेऊन निघालेल्या एक कामगार या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना.
-
येथील रल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने ट्रॅकच्या भागाने नदी सदृश्य रुप धारण केलं होतं.
-
पावसामुळं साचलेलं पाणी उताराकडे वाहत असल्याने रस्त्यावर छोट्या लाटा निर्माण झाल्या होत्या.
-
मुंबई पोलिसांचं वाहनही या साचलेल्या पाण्यामध्ये अडकून पडलं होतं. या पाण्यातून हळूवारपणे मार्ग काढण्याच्या प्रयत्नात असलेला चालक.

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक