-
तेलंगणातील गोशामहल येथील भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा भाजपा प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी यांना पाठवला आहे. (छायाचित्र: टी राजा सिंह/एफबी)
-
टी. राजा सिंह हे तेलंगणातील एक अतिशय प्रसिद्ध नेते आहेत. ते त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. तसेच टी. राजा हे एक अतिशय श्रीमंत नेते देखील आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडे किती संपत्ती आहे आणि त्यांच्या कुटुंबात आणखी कोण-कोण आहे? (छायाचित्र: टी राजा सिंह/एफबी)
-
myneta.info या वेबसाइटनुसार, टी. राजा सिंह आणि त्यांच्या पत्नीचे वेगवेगळ्या बँका, वित्तीय संस्था आणि इतर वित्तीय कंपन्यांमध्ये तब्बल १ कोटी ८८ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. (छायाचित्र: टी राजा सिंह/एफबी)
-
टी राजा सिंह यांच्याकडे टाटा सफारी, महिंद्रा बोलेरो आणि एमजी हेक्टर प्लस यांसारख्या गाड्या आहेत ज्यांची किंमत ५२ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे ६ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आहेत. (छायाचित्र: टी राजा सिंह/एफबी)
-
टी राजा सिंह यांच्या नावावर एक शेतजमीन आहे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर तीन ठिकाणी शेतजमिनी आहेत ज्यांची किंमत ३७ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. याशिवाय, दोघांच्याही नावावर प्लॉट्स देखील आहेत, ज्यांची किंमत ५५ लाख रुपये इतकी आहे. (छायाचित्र: टी राजा सिंह/एफबी)
-
myneta.info या वेबसाइटनुसार, टी राजा सिंह यांच्या पत्नीच्या नावावर एक व्यावसायिक इमारत देखील आहे, या इमारतीची किंमत २४ लाख रुपये आहे. टी. राजा सिंह यांच्याकडे एकूण १ कोटी ५६ लाख रुपयांची मालमत्ता आहे. (छायाचित्र: टी राजा सिंह/एफबी)
-
myneta.info या वेबसाइटनुसार, निव्वळ संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, टी राजा सिंह यांच्याकडे एकूण ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता आहे. (छायाचित्र: टी राजा सिंह/एफबी)
-
त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाल्यास, टी. राजा सिंह यांचा जन्म टी. नवल सिंह यांच्या पोटी झाला. टी. राजा सिंह यांच्या पत्नीचे नाव टी. उषा आहे. त्यांना चार मुले आहेत, यामध्ये तीन मुलं आणि एक मुलगी आहे. (छायाचित्र: टी. राजा सिंह/एफबी)

Elon Musk Political Party : डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारमधून काढलं, आता मस्क यांना स्वत:च सरकार व्हायचंय? का काढला स्वतंत्र पक्ष? ‘ही’ आहेत कारणं