-
फडणवीस सरकारने हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर आज मुंबईत शिवसेना (ठाकरे) व मनसेचा विजयी मेळावा पार पडला. (PC : Shivsena UBT)
-
मनसे अध्यक्ष म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकले आहेत. त्यांच्या मराठीपणाबद्दल तुम्ही शंका घेऊ शकता का? लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले आहेत त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?” (PC : Shivsena UBT/X)
-
राज ठाकरे म्हणाले, “मंत्रिमंडळातील काही नेत्यांचं हिंदी ऐकलं तर आपल्याला फेपरं येईल.” (PC : Shivsena UBT/X)
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, जनतेचा रोष पाहून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी या सत्ताधाऱ्यांनी ‘ठाकरेंची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकली’, अशी वक्तव्ये केली. बर मग पुढे काय? दादा भुसे मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून राज्याचे कृषिमंत्री झाले आहेत. देवेंद्र फडणवीस इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकून मुख्यमंत्री झाले असतील तर मग शाळा कुठल्या माध्यमाची होती याचा संबंध कुठे येतो? कोणाकोणाची मुलं परदेशात शिकत आहेत याच्या याद्या आमच्याकडे आहेत. त्यावर तुम्ही काय बोलणार? (PC : Shivsena UBT/X)
-
राज ठाकरे म्हणाले, दक्षिण भारतात जाऊन पहा, तमिळ भाषेच्या प्रश्नावर तेलुगू भाषेच्या प्रश्नावर सगळेजण कडवटपणे उभे राहतात. त्यांना कोणी विचारत नाहीत तुमची मुले कुठल्या माध्यमात शिकतात. उद्या मी हिब्रू भाषेत शिकेन आणि कडवट मराठी बाणा बाळगेन, कोणाला त्याची अडचण? दक्षिणेतील इंग्रजी माध्यमात शिकलेल्या नेत्यांची अभिनेत्यांची मी यादी आणली आहे. (PC : Shivsena UBT/X)
-
जयललिता – दोमेंतो इंग्लिश मीडियम स्कूल (PC : TIEPL)
-
स्टॅलिन (तमिळनाडूचे मुख्यमंत्री) – इंग्लिश मीडियम स्कूल लॉयला (PC : TIEPL)
-
कनीमोळी – प्रेझेन्टेशन कॉनव्हेन्ट स्कूल (PC : TIEPL)
-
उदयनिधी (एम. करुणानिधी यांचे नातू व तमिळनाडू सरकारमधील युवक कल्याणमंत्री) – डॉन बॉस्को स्कूल (PC : TIEPL)
-
चंद्राबाबू नायडू – इंग्लिश मीडियम स्कूल. (यांचे वडील इंग्रजीचे शिक्षक होते.) (PC : TIEPL)
-
अभिनेते व आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण – सेंट जोसेफ हायस्कूल (PC : TIEPL)
-
नारा लोकेश – स्टॅनफ्रेड स्कूल (PC : TIEPL)
-
ज्येष्ठ अभिनेते कलम हासन – सॅन्थोम हायस्कूल (PC : TIEPL)
-
अभिनेता विक्रम – मॉन्टफोर्ट स्कूल आणि लॉयला कॉलेज (PC : Vikram/Facebook)
-
अभिनेता सूर्या – इंग्लिश मीडियम स्कूल (PC : TIEPL)
-
ए. आर. रहमान – सुरुवातीला पद्मशेषाद्री बालभवन, त्यानंतर मद्रास मिशनरी हायस्कूल (PC : PR Handout via TIEPL)

Devendra Fadnavis : टीकेनंतरही फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार, पण उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “रुदाली…”