-
मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानाचे (राणीची बाग) आकर्षण केंद्र ठरलेल्या पेंग्विनच्या कुटुंबात दोन नवीन सदस्यांची भर पडली आहे.
-
डोनाल्ड आणि डेसी या जोडीने एक मे रोजी जन्म दिलेल्या पेंग्विनचे नाव ओरिओ असे ठेवण्यात आले आहे.
-
मोल्ट आणि फ्लिपर या जोडीने १९ ऑगस्ट रोजी जन्म दिलेल्या पिलाची लिंग तपासणी झाल्यानंतर त्याचे नामकरण करण्यात येणार आहे.
-
राणीच्या बागेत जन्माला आलेल्या दोन पेंग्विनची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी महापौर बंगल्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
-
डोनाल्ड आणि डेसी या पेंग्विन जोडीचे पिल्लू असलेला ओरिओ सध्या पेंग्विन कक्षात बागडत आहे.
-
सुरुवातीच्या काळात ओरिओला डोनाल्ड आणि डेसीसोबत वेगळे ठेवण्यात येत होते.
-
दररोज सकाळी नित्यनियमाने ओरिओचे वजन करुन त्याचा आहार निश्चित केला जात होता.
-
आता ओरिओ किशोरावस्थेत असून वर्षभरात तो प्रौढावस्थेत दाखल होईल.
-
जन्मानंतर काही काळ त्याला डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.
-
आता मात्र, ओरिओ ठणठणीत असून कक्षातील इतर पेंग्विनसोबत ते बागडत असल्याचे सांगण्यात आले.
-
या चमूतील बबल या मादीसोबत तो रहात असल्याचे निरीक्षणातून समोर आले आहे.
-
डोनाल्ड आणि डेसीच्या अपत्याची देखभाल करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने त्याचे नाव ओरिओ ठेवल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाचे अधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
-
राणीच्या बागेत पेंग्विन दाखल झाल्यानंतर काही महिन्यांमध्येच फ्लिपर या मादीने २०१८ मध्ये एक अंडे दिले होते.
-
त्यातून मुंबईतील पहिल्या पेंग्विनचा जन्मही झाला होता.
-
मात्र अवघ्या आठवड्यातच नवजात पेंग्विनचा मृत्यू झाला.
-
मोल्ट आणि फ्लिपर या जोडीने अलिकडेच एक अंडे दिले होते.
-
या अंड्यातून १९ ऑगस्ट रोजी पिलाचा जन्म झाला असून या पिलाला सध्या घरट्यात ठेवण्यात आले आहे.
-
(सर्व फोटो – प्रदीप दास, इंडियन एक्सप्रेस)

Suryakumar Yadav: सूर्याचा घालीन लोटांगण शॉट! मिस्टर ३६० चा फटका पाहून वैभवने दिली भन्नाट रिॲक्शन, पाहा video