-
पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघाचे दौरे सुरू केले आहेत. येवला, बीड, कोल्हापूरनंतर शरद पवार हे आज जळगाव दौऱ्यावर गेले.
-
जळगावातून केलेल्या भाषणात शरद पवारांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. मोदी सरकारकडून केलेल्या सत्तेच्या गैरवापराबद्दल शरद पवारांनी प्रश्न उपस्थित केले.
-
सध्या देशात नरेंद्र मोदींचं राज्य आहे. त्यांना सत्तेत येऊन नऊ वर्षे झाली, या काळात मोदींनी काय केलं? त्यांनी फक्त इतर राजकीय पक्षांना फोडण्याचं काम केलं- शरद पवार
-
त्यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. त्यांनी फक्त एकच गोष्ट केली, ती म्हणजे फोडाफोडीचं राजकारण- शरद पवार
-
लोकांनी आपल्या हातात दिलेली सत्ता लोकांसाठी वापरण्याऐवजी त्यांनी लोकांवर सीबीआय, ईडीच्या माध्यमातून खोटे खटले दाखल करण्याचं काम केलं- शरद पवार
-
काहीही संबंध नसताना आमच्या एका महत्त्वाच्या सहकाऱ्याला (अनिल देशमुख) काही महिने तुरुंगात टाकायचं काम त्यांनी केलं- शरद पवार
-
नवाब मलिकांनाही तुरुंगात टाकलं. अनेकांना तुरुंगात टाकलं- शरद पवार
-
लोकांनी दिलेली सत्ता लोकांना सन्मानाने जगता येईल, यासाठी वापरण्याऐवजी भाजपाने सत्तेचा गैरवापर केला”, अशा शब्दांत शरद पवारांनी टीकास्र सोडलं- शरद पवार
-
देशाचे पंतप्रधान मोदी भोपाळला गेले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका-टिप्पणी केली- शरद पवार
-
मोदींनी सांगितलं की, हे भ्रष्ट लोक आहे. आमच्याकडे अनेकांची माहिती आहे- शरद पवार
-
माझं मोदीसाहेबांना नम्रतेनं एकच सांगणं आहे, जर कुणी चुकीचं काम केलं असेल तर त्यांच्याविरुद्ध खटला भरा. चौकशी करा- शरद पवार
-
पण तुमचे आरोप खोटे ठरले तर तुम्ही स्वत:ला काय शिक्षा देणार? हेही संपूर्ण देशाला सांगा. खोटे आरोप करणं हे देशाच्या हिताचं नाही- शरद पवार
-
मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्यावरूनही शरद पवारांनी राज्य सरकारवर टीका केली.
-
जळगाव येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
-
सर्व फोटो सौजन्य (NCP/FB)

Maharashtra Day Wishes: महाराष्ट्र दिनाच्या द्या मराळमोळ्या शुभेच्छा! प्रियजनांना WhatsApp Status, Facebook Messagesवर पाठवा खास शुभेच्छा संदेश