-
दरवर्षी ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक स्त्रीच्या सन्मान आणि अस्तित्वासाठी हा एक खास दिवस आहे. महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरूक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम )
-
प्रत्येक जण हा दरवर्षी हा दिवस आपापल्या परीने साजरा करतो. तर आज छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजेच सीएसएमटी या रेल्वे स्थानकावर महिला दिन अनोख्या पद्धतीत साजरा करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य: Ganesh Shirsekar)
-
सीएसएमटी रेल्वे पोलिस स्टेशनच्या वतीने आज शुक्रवारी खास उपक्रम राबवण्यात आला आहे. (फोटो सौजन्य: Ganesh Shirsekar)
-
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘सखी इन खाकी’ या उपक्रमाअंतर्गत महिलांना जनजागृती पत्रक वाटण्यात आले. (फोटो सौजन्य: Ganesh Shirsekar)
-
सीएसएमटी रेल्वे पोलिस स्टेशनच्या महिला पोलीस अधिकारी यांनी प्रवासी महिलांना जनजागृती पत्रक, केक आणि गुलाब देऊन आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला आहे. (फोटो सौजन्य: Ganesh Shirsekar)
-
महिला पोलीस अधिकारी यांनी स्वतः ट्रेनमध्ये जाऊन या महिलांना ही गुलाबाची फुले दिली आहेत. (फोटो सौजन्य: Ganesh Shirsekar)
-
तसेच रेल्वे स्थानकावर उपस्थित आणि ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व तरुणी आणि महिलांना गुलाबाच्या फुलांचे वाटप करण्यात आले. (फोटो सौजन्य: Ganesh Shirsekar)
-
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई पोलिसांद्वारे दिलेलं हे खास सरप्राईज पाहून काही महिला भावुक होताना तर काहींचा आनंद गगनात मावताना दिसत नाही आहे. (फोटो सौजन्य: Ganesh Shirsekar)
-
तरुणी, चिमुकल्या, आजी, जॉबला जाणाऱ्या अनेक महिलांचा सीएसएमटी पोलीस स्टेशनच्या महिला अधिकाऱ्यांनी अनोखा सन्मान केला आहे. (फोटो सौजन्य: Ganesh Shirsekar)

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत; “ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्याइतकीच पण…”