-
होर्मुझ सामुद्रधुनी ही पर्शियन खाडीला अरबी समुद्राशी जोडते. हा एक अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. (Photo: Indian Express)
-
जगभरात पुरवठा केले जाणारे तेल आणि एलएनजी याचा जवळपास ३० टक्के हिस्सा याच मार्गावरून जातो. जर हा रस्ता बंद झाला तर तेलाचा पुरवठा कमी होईल आणि किंमती देखील वाढतील. (Photo: Indian Express)
-
होर्मुझ सामुद्रधुनी काय आहे? ती बंद करण शक्य आहे?
होर्मुझ सामुद्रधुनी हा एक जलमार्ग आहे. सामुद्रधुनी म्हणजे दोन मोठ्या जलस्रोतांना जोडणारा अरुंद जलमार्ग. होर्मुझ सामुद्रधुनी ही पर्शियन खाडीला अरबी समुद्राशी जोडते. हा एक अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. होर्मुझ सामुद्रधुनीची रुंदी खूपच कमी आहे, ज्यामुळे इराणला ती अडवणे सोपे आहे. (Photo: Indian Express) -
होर्मुझ सामुद्रधुनी जगातील सर्वात मोठ्या तेल निर्यातदार देशांना जसे की इराण, सौदी अरेबिया आणि युएई यांना अरबी समुद्राशी जोडते. जगातील २० टक्के तेल होर्मुझ सामुद्रधुनीतून निर्यात केले जाते. २०२४ मध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एका दिवसाला २० दशलक्ष बॅरल तेलाची वाहतूक सुरू होती. (Photo: Indian Express)
-
या देशांकडे होर्मुझ सामुद्रधुनीशिवाय दुसऱ्या देशांना तेल पाठवण्यासाठी दुसरा कोणताही सागरी मार्ग नाही. एक मार्ग आहे तो म्हणजे लाल समुद्र किंवा ओमानच्या रस्तेमार्गाने तेल वाहतूक करणे, यामुळे वाहतुकीचा खर्च वाढेल. व त्याचा परिणाम तेलाच्या किमतींवर होईल आणि तेलाच्या वाढीव किमतीचा थेट परिणाम कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल. जर होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाली तर संपूर्ण जगात अराजकता निर्माण होईल. (Photo: Indian Express)
-
इराण होर्मुझबाबत हा निर्णय का घेत आहे?
२२ जून रोजी अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला. अमेरिकेने दावा केला की त्यांनी इराणचा सर्वात सुरक्षित फोर्डो अणुप्रकल्प नष्ट केला आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या संसदेने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणच्या संसदेच्या निर्णयानंतर, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी चीनला इराणला होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. त्यांनी ही एक मोठी चूक असल्याचे म्हटले आहे आणि म्हटले आहे की जर इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली तर ती त्यांच्यासाठी आर्थिक आत्महत्या ठरेल. (Photo: Indian Express) -
होर्मुझ सामुद्रधुनी यापूर्वी बंद करण्यात आली आहे?
इराणने आजपर्यंत कधीही होर्मुझ सामुद्रधुनी बंद केलेली नाही. ८० च्या दशकात इराण-इराक युद्धादरम्यान दोन्ही देशांनी सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर हल्ला केला होता, परंतु वाहतूक कधीही रोखली गेली नाही. आताही असे होण्याची शक्यता कमी आहे. कारण इराणचा स्वतःचा व्यापारही याच मार्गाने चालतो. दुसरे म्हणजे, जर इराणने हा मार्ग रोखला तर त्याचा थेट परिणाम इराण शेजारील देशांच्या व्यापारावर होईल, ज्यामुळे त्याचे त्याच्या शेजाऱ्यांशी असलेले संबंध बिघडण्याचाही धोका वाढतो. (Photo: Indian Express) -
सामुद्रधुनी बंद होण्याचा भारतावरही होणार परिणाम
तज्ज्ञांच्या मते जर स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद करण्यात आले आणि जहाजांची ये-जा बंद झाली तर संपूर्ण जगाबरोबरच भारतावर देखील याचा परिणाम होऊ शकतो. इराणच्या या निर्णयानंतर तेलाचा पुरवठा कमी होईल आणि महागाई वाढू शकते. यामुळे भारताच्या आर्थिक गतीवर देखील परिणाम होऊ शकतो. (Photo: Indian Express) -
(Photo: Indian Express) हेही पाहा –India Edible Oil Import : भारत दरवर्षी किती खाद्य तेल आयात करतो? त्यामागची कारणं काय? कोणते देश करतात पुरवठा?

Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते…; पाहा, जपानी लोकांच्या प्रतिक्रिया