-
कपिल शर्मा हा त्याच्या विनोदी कार्यक्रमांसाठी ओळखला जातो. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’, ‘द कपिल शर्मा शो’, ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्रमांतून अभिनेत्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
सध्या त्याचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ सीझन ३ नेटफ्लिक्सवर पाहायला मिळत आहे. त्यांच्यावर होणारे विनोद, कलाकारांची वक्तव्ये, खळखळून हसवणारा विनोदी कार्यक्रम म्हणून या शोची लोकप्रियता मोठी आहे. तसेच, कपिल शर्माचा चाहतावर्गही मोठा आहे.
-
तसेच तो आता व्यवसायातही उतरला आहे. परंतू त्याने काही दिवसांपूर्वी सुरू केलेल्या नव्या कॅफेवर गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चला त्याच्या या कॅफेबद्दल जाणून घेऊयात…
-
कपिलच्या कॅनडामधील सरे इथे नुकत्याच सुरू केलेल्या ‘कॅप्स कॅफे’वर गोळीबार करण्यात आला आहे. कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी यांनी काही दिवसांपूर्वीच हा कॅफे सुरू केला होता.
-
कॅफे सुरू झाल्याच्या अवघ्या तीन दिवसांतच त्यावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती गाडीत बसून बंदुकीने कॅफेच्या दिशेने गोळ्या झाडताना दिसत आहे. या घटनेची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग उर्फ लड्डी याने घेतली आहे.
-
दरम्यान, कपिलच्या नावावरूनच या कॅफेला कॅप्स कॅफे असं नाव देण्यात आले आहे. त्याच्या नावाचं एक इन्स्टाग्राम हँडल देखील आहे जिथे तुम्हाला या नव्याकोऱ्या रेस्टॉरंटची झलक पाहता येते.
-
हे रेस्टॉरंट खूप भव्य आणि शाही आहे आणि कपिलच्या या KAP’S CAFE चं डिझाईन देखील खूप आकर्षक आहे.
-
संपूर्ण कॅफे गुलाबी फुलांच्या थीमने डिझाइन केला आहे, इथे भारतीय आणि परदेशी नागरिकही जातात.
-
इन्स्टा अकाऊंटवर कुकीज, डोनट्स आणि पेस्ट्रीचे फोटो शेअर केले आहेत. या पेजला काही दिवसांतच २९ हजारांहून अधिक लोकांनी फॉलो केले आहे.
-
या पेजवरचे फोटो पाहून चाहत्यांना कपिलचा हा कॅफे खूपच आवडला असल्याचे पाहायाला मिळते आहे. विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर कपिल आणि गिन्नीचं लोकांनी नव्या कॅफेसाठी अभिनंदनही केलं आहे. (सर्व फोटो सौजन्य- कपिल शर्मा, कॅप्स कॅफे इन्स्टाग्राम हँडल) हेही पाहा- Photos : करीना कपूर खानचं मोनोकिनीमध्ये बीचवर फोटोशूट; नेटकरी म्हणाले, “पुढचं बाळ…”

बापरे! सीएसएमटी-गोरेगाव ट्रेनच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; किळसवाणा VIDEO पाहून धक्का बसेल