-
सेलेना गोमेझ आणि बेनी ब्लँको यांनी डिसेंबर २०२४ मध्ये लग्न केले आणि गेल्या काही महिन्यांत या जोडप्याने अनेक मुलाखतींद्वारे त्यांच्या नात्यातील बारकावे शेअर केले आहेत.
-
‘द टेबल मॅनर्स’ या पॉडकास्टच्या अलीकडच्या भागात बेनी ब्लँकोनं सेलेना गोमेझचं मन जिंकण्यासाठी काय काय केलं त्याबद्दल सांगितलं. तो म्हणाला, “मला अशी व्यक्ती हवी होती, जिच्यासोबत मी आयुष्यभर राहू शकेन. मी एकदा कागदावर माझ्या स्वप्नातील व्यक्तीबद्दल लिहिलं होतं – आणि सेलेना अगदी तशीच निघाली. मी जे काही लिहिलं होतं, ते सगळं सेलेनामध्ये मला सापडलं.
-
बेनी ब्लँकोनं ‘द टेबल मॅनर्स’ पॉडकास्टमध्ये आपल्या अनुभवाबद्दल सांगताना म्हटले, जर तुम्हाला आयुष्यात ती योग्य व्यक्ती शोधायची असेल, तर आधी तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक आणि अपायकारक गोष्टी दूर कराव्या लागतात. त्यानंतर तुम्ही जोडीदारामध्ये कोणते गुण असावेत, अशी अपेक्षा करता, याची स्पष्ट यादी तयार करणं गरजेचं असतं.
-
त्याच्या बदलता न येणाऱ्या अपेक्षा (नॉन-निगोशिएबल्स) शेअर करताना बेनी ब्लँको म्हणाला, “माझी यादी अतिशय साधी होती. मला माझ्या वयाच्या आसपासचा, दयाळू व काळजी घेणारा असा जीवनसाथी हवा होता. माणुसकी आणि सहानुभूती असणं मला खूप महत्त्वाचं वाटत होतं.”
-
एका पूर्वीच्या मुलाखतीत बेनी ब्लँकोनं स्पष्टपणे सांगितलं की, त्याचं आणि सेलेनाचं नातं खूप सकारात्मक आणि समजूतदार आहे. तो म्हणाला, “आता मी तिला इतकं मानतो की, ती ज्या जमिनीवर चालते, तिचीही मी पूजा करतो. आणि मला वाटतं, तीही माझ्या बाबतीत तसाच विचार करते. आमच्यात अहंकाराला जागा नाही. ती माझ्या यशासाठी मनापासून प्रार्थना करते आणि मी तिच्या यशासाठी. मी रोज सकाळी उठतो आणि स्वतःला विचारतो – ‘मी तिचं आयुष्य अधिक सुंदर कसं बनवू शकतो?’ आणि मला खात्री आहे की, तीही हेच करते.”
-
बेनी ब्लँकोला असा विश्वास आहे की, बहुतांश लोक, विशेषतः पुरुष, आपल्या जोडीदाराचं नीट ऐकत नाहीत. तो म्हणतो, “माझ्या मते, पुरुष आपल्या जोडीदाराच्या भावना आणि विचारांकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. आपण इतरांशी तसं वागायला हवं, जसं वागणं आपल्यालाही आवडेल. तुमचा खरा आणि सर्वांत चांगला मित्र शोधा – आणि केवळ त्यावर समाधान मानू नका. सेलेना माझी अशीच खरी आणि सर्वोत्तम मैत्रीण आहे,” असं तो पुढे म्हणाला.

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…