जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
उथम गौडा यांनी २०१९ मध्ये ‘कॅप्टन फ्रेश’ची स्थापना केली. बेंगळुरूस्थित या कंपनीने सीफूडच्या जगात खळबळ निर्माण केली आहे. ही कंपनी मासे आणि सीफूड यांसारखी प्रथिनयुक्त उत्पादने थेट शेतकऱ्यांकडून दुकानांमध्ये वितरित करते. उथम गौडा हे आधीपासून सीफूडच्या व्यवसायात होते. हा बाजार अतिशय अव्यवस्थित असल्याचे त्यांच्या लक्षात आले.