Utham Gowda Success Story: उथम गौडा यांनी २०१९ मध्ये ‘कॅप्टन फ्रेश’ची स्थापना केली. बेंगळुरूस्थित या कंपनीने सीफूडच्या जगात खळबळ निर्माण केली आहे. ही कंपनी मासे आणि सीफूड यांसारखी प्रथिनयुक्त उत्पादने थेट शेतकऱ्यांकडून दुकानांमध्ये वितरित करते. उथम गौडा हे आधीपासून सीफूडच्या व्यवसायात होते. हा बाजार अतिशय अव्यवस्थित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. येथे नेहमी मालाचा तुटवडा असतो. ही समस्या सोडविण्यासाठी त्यांनी ‘कॅप्टन फ्रेश’ सुरू केले. स्थापनेपासून अवघ्या काही वर्षांत ती हजारो कोटींची कंपनी बनली आहे. तेव्हा चला, उथम गौडा यांच्या यशाच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ या.

मोठ्या पगारावर करत होते काम

उथम गौडा हे ‘कॅप्टन फ्रेश’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. हा उपक्रम सुरू करण्यापूर्वी ते नेक्कांती सी फूड्स लिमिटेडमध्ये कार्यकारी उपाध्यक्ष होते. त्यांनी तीन कॅपिटलमध्ये सहयोगी उपाध्यक्ष म्हणूनही काम केले. काम करताना उत्तम यांना मोठा पगार मिळत होता. त्यांनी एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्चमधून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. सीफूड पुरवठा साखळीत क्रांती घडविण्याच्या उद्देशाने उथम गौडा यांनी नोकरी सोडून स्वतःची कंपनी सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Success Story Of Chitraang Murdia
Success Story Of Chitraang Murdia : एकेकाळी होता आयआयटी टॉपर, डॉक्टर होण्यासाठी सगळंच सोडलं; वाचा, चित्रांग मुरडियाची गोष्ट
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा… मुकेश अंबानी, गौतम अदानी यांच्यापेक्षाही श्रीमंत, ‘या’ व्यक्तीने एकेकाळी केलं होतं रेस्टॉरंटमध्ये वेटरचं काम, वाचा प्रसिद्ध कंपनीच्या सीईओचा प्रवास

पुरवठा साखळी (Supply chain) सुधारण्याचा उद्देश

‘कॅप्टन फ्रेश’ दररोज अंदाजे १०० टन ताजे मासे आणि तीन डझनहून अधिक प्रकारचे सीफूड विकते. कंपनीची ५० पेक्षा जास्त कलेक्‍शन सेंटर्स आहेत. ते भारतातील किनारी राज्यांमधील २,५०० हून अधिक स्टोअर्सना त्यांची सेवा देतात. कॅप्टन फ्रेशचा मुख्य उद्देश पुरवठा साखळी सुधारणे हा आहे. कंपनी दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत ग्राहकांना वस्तू पोहोचवण्याची हमी देते. त्यामुळे विश्वासार्हता वाढते आणि सीफूड खराब होण्याचा धोका कमी होतो.

कंपनीची मजल चार हजार कोटींहून अधिक रकमेवर

एकूणच कंपनीला आतापर्यंत १२.५ दशलक्ष गुंतवणूक मिळाली आहे. या गुंतवणुकीतून कंपनीला आपला व्यवसाय युरोप आणि अमेरिकेतही वाढवायचा आहे. तिला सीफूड पुरवठा साखळी अधिक पारदर्शक बनवायची आहे. या कंपनीची किंमत चार हजार कोटींहून अधिक आहे.

हेही वाचा… वयाच्या ९१व्या वर्षीही रोज जातात ऑफिसला, वाचा ७१ रुग्णालये आणि कोटींची संपत्ती असलेल्या डॉ. प्रताप रेड्डी यांचा प्रेरणादायी प्रवास

खूप पूर्वी जाणवली संधी

जून २०२१ मध्ये Accel Partners आणि विद्यमान गुंतवणूकदार Matrix Partners India यांच्या नेतृत्वाखालील मालिका A फेरी उथम गौडा यांनी $12 दशलक्ष इतक्या रकमेचे भांडवल जमा केले. त्यात अंकुर कॅपिटल आणि इनक्युबेट फंडाचा अतिरिक्त सहभागही होता. काम करताना या कामात उथम गौडा यांना भरपूर संधी दिसल्या. हा बाजार अतिशय अव्यवस्थित असून, येथे मालाचा तुटवडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.

Story img Loader