ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून गोळीबार; पूंछमध्ये ४ मुलांसह ११ नागरिकांचा मृत्यू
जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेसह सीमावर्ती भागात पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात बुधवारी ११ जणांचा मृत्यू झाला, ज्यात चार लहान मुलांचा समावेश आहे आणि ४० लोक जखमी झाले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. उरी आणि तंगधार सेक्टरमध्येही गोळीबार सुरू आहे. पूंछमध्ये १९७१ नंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणांवर तोफगोळ्यांचा मारा झाला. भारतीय सैन्याने प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या अनेक चौक्या उध्वस्त केल्या.