दिल्ली-शिर्डी विमानात मद्यपी प्रवाशाकडून एअर होस्टेसचा विनयभंग; शौचालयाजवळ जाताच…
दिल्ली-शिर्डी इंडिगो विमानात मद्यधुंद प्रवाशाने एअर होस्टेसचा विनयभंग केल्याची घटना घडली. शौचालयाजवळ प्रवाशाने एअर होस्टेसला चुकीच्या पद्धतीने हात लावला. क्रू मॅनेजरने तक्रार केल्यानंतर प्रवाशाला अटक करण्यात आली. वैद्यकीय चाचणीत तो मद्याच्या अमलाखाली असल्याचे स्पष्ट झाले.