पाकिस्तानी हवाई दलानं भारतीय हद्दीत हल्ले केल्याचे फेक व्हिडीओ व्हायरल, जाणून घ्या सत्य!
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननेही भारतावर हल्ला केला. काही पाकिस्तान समर्थकांनी चुकीचे व्हिडिओ व्हायरल केले, ज्यात श्रीनगर एअरबेसवर हल्ल्याचा दावा करण्यात आला. पीआयबी फॅक्ट चेकने हे व्हिडिओ खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. हे व्हिडिओ २०२४ मधील पाकिस्तानच्या अंतर्गत संघर्षाचे आहेत. अधिकृत माहितीकरता भारत सरकारच्या स्त्रोतांवर अवलंबून राहा.