भारतानं ऑपरेशन सिंदूर करताच पाकिस्तानचा थयथयाट; सीमेवर गोळीबार, भारतानं तिथेही गप्प केलं!
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्ताननं थयथयाट सुरू केला आहे. भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. यानंतर पाकिस्ताननं सीमेवर गोळीबार केला. भारतीय लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानच्या हल्ल्यात एक स्थानिक महिला मृ्त्यूमुखी पडली. पूंछ आणि राजौरी जिल्ह्यातील सीमांवर गोळीबार सुरू आहे.