अमेरिकन उपाध्यक्षांचं पंतप्रधान मोदींकडून उत्साहात स्वागत, दोघांमध्ये काय चर्चा झाली?
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. व्हॅन्स यांच्यासोबत त्यांच्या पत्नी उषा आणि मुलंही होती. मोदींनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध, व्यापार करार, ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञानातील सहकार्यावर चर्चा केली. टॅरिफच्या मुद्द्यावर अद्याप चर्चा झाली नाही, परंतु आगामी बैठकीत यावर चर्चा होणार आहे.